Type Here to Get Search Results !

उदगीर शहर पोलीस ठाण्यात समाजसुधारक महात्मा जोतिबा फुले यांच्या जयंती निमित्त अभिवादन

 उदगीर शहर पोलीस ठाण्यात समाजसुधारक महात्मा जोतिबा फुले यांच्या जयंती निमित्त अभिवादन



उदगीर: समाजसुधारक महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंती निमित्त उदगीर शहर पोलीस ठाणे येथे ११ एप्रिल रोजी पोलीस प्रशासनाच्या वतीने त्यांना अभिवादन करण्यात आले.यावेळी पोलीस निरीक्षक दिलीप गाडे यांनी व पोलीस कर्मचाऱ्यांनी महात्मा फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून त्यांच्या कार्याला विनम्र अभिवादन केले. समाजातील दुर्बल व वंचित घटकांच्या उन्नतीसाठी त्यांनी केलेले कार्य, स्त्रीशिक्षणासाठी घेतलेली पुढाकार आणि समतेचा दिलेला संदेश याबद्दल यावेळी उपस्थितांनी कृतज्ञता व्यक्त केली.कार्यक्रमात उपस्थित अधिकाऱ्यांनी आपल्या मनोगतातून महात्मा फुले यांच्या विचारांचा आजच्या समाजातही तितकाच महत्व असल्याचे सांगितले. त्यांच्या विचारांचा आदर्श घेऊन समाजात समानता व बंधुता वाढविण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत,असे आवाहन पोलीस निरीक्षक दिलीप गाडे यांनी यावेळी केले.याप्रसंगी पोलीस ठाण्यातील सर्व अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments