Type Here to Get Search Results !

श्रीराम प्रतिष्ठान ची उत्सवानंतर आढावा बैठक संपन्न बैठकीत मांडला उत्सवाचा लेखाजोखा

 श्रीराम प्रतिष्ठान ची उत्सवानंतर आढावा बैठक संपन्न बैठकीत मांडला उत्सवाचा लेखाजोखा



 उदगीर विशेष प्रतिनिधी ((श्रीधर जाधव ))

उदगीर : श्रीराम प्रतिष्ठानच्या वतीने गेल्या चार वर्षांपासून भव्य दिव्य रामनवमी उत्सव विविध उपक्रमांच्या माध्यमातून मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. यंदाही दोन महिन्यांच्या नियोजनानंतर धर्मसभा, शोभायात्रा व इतर कार्यक्रमांच्या माध्यमातून हा उत्सव उदगीर शहरात उत्साहात पार पडला. या उत्सवानंतर आज आढावा बैठक घेण्यात आली.

या आढावा बैठकीत उदगीर शहरातील विविध क्षेत्रातील दानशूर व्यक्तींकडून लोकवर्गणीतून उभारण्यात आलेल्या निधीचा जमा-खर्चाचा सविस्तर आढावा सादर करण्यात आला. श्रीराम प्रतिष्ठानचे अध्यक्ष सतीश राजेंद्र पाटील यांच्या नेतृत्वाखाली, तसेच आशिष अंबरखाने, प्रशांत मांगुळकर , अभिजीत पाटील आदी मार्गदर्शकांच्या उपस्थितीत ही बैठक पार पडली.

यावेळी अध्यक्ष सतीश राजेंद्र पाटील यांनी संपूर्ण हिशोब पारदर्शकपणे मांडत एकूण ८,३९,९०० रुपये लोकवर्गणीतून जमा झाल्याची माहिती दिली. त्यापैकी ६,७९,३८७ रुपये धर्मसभा व शोभायात्रेसाठी खर्च करण्यात आले असून १,६०,५१३ रुपये शिल्लक राहिले असल्याचे स्पष्ट करण्यात आले. ही शिल्लक रक्कम पुढील उपक्रमांसाठी वापरण्यात येणार असल्याचेही सांगण्यात आले.

तसेच, आगामी वर्षभरात राबविण्यात येणाऱ्या उपक्रमांबाबतही व्यापक चर्चा करण्यात आली. धर्मजागृतीसाठी कार्य करणाऱ्या सर्व घटकांना सोबत घेऊन पुढील नियोजन करण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला.

या बैठकीस परमानंद निलंगे , अजय नवरखेले, शुभम लोणीकर, कल्लाप्पा स्वामी, शुभम सुपारे, माधव रोडगे, नितीश शिरसे, कबाडे अजय, शेटकार राजेश, बबन पाटील, विष्णू लोणीकर, निखिल पाटील, आकाश चव्हाण, कपिल म्हेत्रे आदी उपस्थित होते.

ही आढावा बैठक खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली.

Post a Comment

0 Comments