Type Here to Get Search Results !

शोभायात्रेत सांस्कृतीक व प्रबोधनात्मक देखाव्याचे होणार सादरीकरण -- पञकार आधिवेशनाची सुरुवात भव्यदिव्य शोभायाञेने होणार

 शोभायात्रेत सांस्कृतीक व प्रबोधनात्मक देखाव्याचे होणार सादरीकरण

--

पञकार आधिवेशनाची सुरुवात भव्यदिव्य शोभायाञेने होणार



उदगीर : अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेच्या वतीने १८ व १९ एप्रिल रोजी उदगीर येथे होत असलेल्या राष्ट्रीय पत्रकार अधिवेशनाची सुरुवात भव्य शोभायात्रेने होणार आहे.या शोभायात्रेत सांस्कृतीक व प्रबोधनात्मक देखाव्याचे होणार सादरीकरण होणार आहे.


देशभरातून तसेच महाराष्ट्रातील विविध प्रिंट व इलेक्ट्रॉनिक माध्यमांतील अंदाजे ३००० पेक्षा जास्त पत्रकार सहभागी होणार आहेत. अधिवेशनाचे स्वागताध्यक्ष म्हणून लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले, सहस्वागतध्यक्ष माजी मंत्री आमदार संजय बनसोडे तर कार्याध्यक्ष नगराध्यक्षा स्वाती हुडे असणार आहेत.यामध्ये मुख्यमंत्री देवेद्र फडणवीस, राज्यातील आमदार, परिषदेचे मुख्य विश्वस्त एस.एम. देशमुख, अध्यक्ष मिलिंद अष्टिवकर तसेच विविध पक्षाचे आमदार मान्यवर उपस्थित राहणार आहेत.  


या अधिवेशनाच्या निमित्ताने आयोजित शोभायाञा शनिवारी (ता.१८) रोजी सकाळी सात वाजता निघणार आहे.या शोभायाञेत विविध महाविद्यालय, शाळा, संस्था, सामाजिक संस्था ,भजनी मंडळे, गोंधळी मंडळे, आराधी मंडळे, गुग्गळ कलावंत, कलापथके तसेच शासकिय कार्यालयांनी देखाव्यासह सहभागी व्हावे असे आवाहन शोभायाञा समितीचे अध्यक्ष प्रा. बिभीषन मद्देवाड9823160552 यांनी केले आहे.

Post a Comment

0 Comments