Type Here to Get Search Results !

श्री.जयदीप सेवाभावी शिक्षण संस्थेतर्फे उपजिल्हाधिकारी यांना निवेदन

 श्री.जयदीप सेवाभावी शिक्षण संस्थेतर्फे उपजिल्हाधिकारी यांना निवेदन



उदगीर/प्रतिनिधी 


येथील विविध शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक, धार्मिक कार्यात अग्रेसर असलेली लातूर जिल्ह्यात अल्पावधीतच नावारूपास आलेली श्री.जयदीप सेवाभावी शिक्षण संस्था उदगीर जिल्हा लातूर या संस्थेने 9 वी वर्गातून 10 वी वर्गात व11 वी वर्गातून 12 वी वर्गात जाणाऱ्या सर्व माध्यमांच्या मुलींना मोफत पास चा कालावधी वाढू मिळावा, यासाठी उपजिल्हाधिकारी उदगीर यांच्यामार्फत महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री मा.ना देवेंद्र फडणवीस साहेब,उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री श्रीमती सुनेत्रा पवार,मा.ना प्रताप सरनाईक परिवहन मंत्री महाराष्ट्र राज्य मुंबई,शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांना एका निवेदनाद्वारे दिनांक 20/03/2026 रोजी केली आहे. कारण 9 वी व 11 अकरावी वर्गातील मुलींचा अहिल्यादेवी होळकर मोफत पास योजनेचा कालावधी 12 मार्च 2026 रोजी संपलेला असून 9 वी वर्गातून 10 वी वर्गात, 11वी वर्गातून 12 वी वर्गात माध्यमिक- उच्च माध्यमिक विद्यालयात उन्हाळी क्लासेस संपूर्ण महाराष्ट्रा राज्यात संपन्न होतात. ज्यादा उन्हाळी वर्गाच्या तासिका नाही घेतल्या तर दहावी बोर्ड व बारावी बोर्ड परीक्षेचा अभ्यासक्रम पूर्ण होत नाही. त्यामुळे ग्रामीण भागातील मुलीची गळती थांबावी व ग्रामीण भागातील मुलींचे शिक्षण अखंड चालवावे यासाठी एक अत्यावश्यक बाब म्हणून एस.टी पासचा कालावधी वाढवून द्यावा अशी मागणी श्री.जयदीप सेवाभावी शिक्षण संस्थेचे सचिव निवृत्ती जवळे यांनी एका निवेदनाद्वारे केली आहे.

Post a Comment

0 Comments