Type Here to Get Search Results !

लातूर ग्रामीण पोलिसांचा गुटखा माफियांवर जबरदस्त प्रहार; 1.08 लाखांचा मुद्देमाल जप्त, एक जेरबंद – दुसरा फरार!”

 “लातूर ग्रामीण पोलिसांचा गुटखा माफियांवर जबरदस्त प्रहार; 1.08 लाखांचा मुद्देमाल जप्त, एक जेरबंद – दुसरा फरार!”



लातूर (गातेगाव), 

लातूर ग्रामीण उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांच्या पथकाने प्रतिबंधित गुटखा आणि तंबाखूजन्य पदार्थांच्या अवैध वाहतुकीवर मोठी धडक कारवाई करत गुटखा माफियांना जोरदार धक्का दिला आहे. या कारवाईत एक आरोपीला अटक करण्यात आली असून, तब्बल 1 लाख 08 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

पोलीस स्टेशन गातेगाव येथे दाखल गुन्हा क्रमांक 43/2026 नुसार, दि. 23 मार्च 2026 रोजी रात्री 11.15 वाजण्याच्या सुमारास लातूर ते कळंब रोडवरील मौजे तांदुळवाडी शिवारात, हॉटेल संजीवनी समोर ही कारवाई करण्यात आली.

या प्रकरणात मनोज कोंडीराम सरवदे (वय 26, रा. काटगाव, ता. जि. लातूर) याला पोलिसांनी रंगेहात पकडले, तर त्याचा साथीदार ऐजाज तांबोळी (रा. लातूर) हा फरार झाला असून, त्याचा शोध सुरू आहे.

कारवाईदरम्यान पोलिसांनी आरोपीकडून एस.एम. बाबा सुपर क्वॉलिटी नावाचा सुगंधित तंबाखू (20 पुडे, किंमत 8,000 रुपये) तसेच एमएच 24 एटी 3525 क्रमांकाचा ऑटो रिक्षा (अंदाजे 1 लाख रुपये) असा एकूण 1,08,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

तपासात आरोपीने हा प्रतिबंधित गुटखा लातूर शहरातील गंजगोलाई, शिवाजी रोडवरील ‘तांबोळी ट्रेडर्स’ दुकानातून आणल्याची कबुली दिली आहे. या प्रकरणी महाराष्ट्र शासनाने बंदी घातलेल्या तंबाखूजन्य पदार्थांची वाहतूक व विक्री केल्याप्रकरणी भारतीय न्याय संहितेच्या कलम 123, 274, 275, 223 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही धडक कारवाई लातूर ग्रामीण उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयाच्या पथकातील शिवा पाटील, अमोल स्वामी, मदन मुळे तसेच गातेगाव पोलीस स्टेशनचे पोउपनि जाधव व पोलीस कॉन्स्टेबल गिरी यांनी संयुक्तपणे पार पाडली.

सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोउपनि जाधव करत असून, फरार आरोपीचा शोध वेगाने सुरू आहे.

Post a Comment

0 Comments