Type Here to Get Search Results !

ईश्वराच्या नामस्मरणाने ऊर्जा मिळते : माजी मंत्री आ.संजय बनसोडे

 *ईश्वराच्या नामस्मरणाने ऊर्जा मिळते : माजी मंत्री आ.संजय बनसोडे*



*श्री खडकाळी कल्लेश्वर मंदिराला पर्यटन स्थळाचा दर्जा मिळवुन देण्यासाठी प्रयत्न करणार*


*उदगीर* : आपल्या सर्वांना धार्मिक वारसा आहे. दया आणि कृपा ही ईश्वराची देण आहे. 'भक्ती हीच सर्वश्रेष्ठ शक्ती आहे' आणि ही भक्ती आम्हाला गुरुंनी शिकवली म्हणूनच आज या परिसरात भक्तीचा सुगंध पसरला आहे. आपण सर्वजन ईश्वराच्या भक्तीत तल्लीन होतो व ईश्वराचेच नामस्मरण करतो असे केल्याने आपल्या मनाला समाधान लाभुन ईश्वराच्या नामस्मरणाने ऊर्जा मिळत असल्याचे मत माजी मंत्री आमदार संजय बनसोडे यांनी सांगितले.


ते तोगरी ता.उदगीर येथील श्री खडकाळी कल्लेश्वर मंदिराच्या कळशारोहण सोहळ्याप्रसंगी बोलत होते. 


यावेळी डाॅ.शंभुलिंग शिवाचार्य महाराज, माजी उपसभापती रामराव बिरादार, तोगरी गटाचे जि.प. सदस्य ज्ञानेश्वर बिरादार येणकीकर,माजी जि.प. सदस्य रमेश पाटील तोगरीकर, संजय पाटील, महेश यॆरनाळे, सुभाष धनुरे, प्रकाश बिरादार, कमलाकर फुले, मनोज चिखले, सरपंच अश्विनी स्वामी, रवींद्र काळा, संतोष पाटील, कलप्पा पाटील, कैलाश पाटील, संतोष तोडकर, सतिश पाटील, गुंडप्पा शिखरे,कांताबाई काळा, अॅड.दयानंद पाटील, सविता पंचाक्षरे, इंदुबाई येरनाळे, आदी उपस्थित होते.


पुढे बोलताना आ.संजय बनसोडे यांनी, 

मतदार संघातील सर्व जनतेच्या सुखासाठी श्री कल्लेश्वरा चरणी साकडे घातले आहे. या मंदिराची ३०० वर्षापूर्वीची आख्यायिका असुन मंदिराची मंहती व इतिहास मोठा आहे. गावातील मंदिर उभारणीसाठी लाखो रुपयाचा निधी दिला असून या मंदिराला ही निधी देणार आहे व या श्री खडकाळी कल्लेश्वर मंदिराला पर्यटन स्थळाचा दर्जा मिळवुन देण्यासाठी मी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले.


श्री खडकाळी कलेश्वरांच्या चरणी नतमस्तक होवून त्यांचे आशिर्वाद घेतले इथे आले की समाजसेवा करण्याची नवी ऊर्जा मला मिळते. आपण सर्व माझ्या माता भगिनी व माझ्या बांधवांनी माझ्यावर मोठा विश्वास दाखवून दुसऱ्यांदा मोठे मताधिक्य देवुन निवडून दिलात म्हणून मी 'जे जे नव ते ते उदगीरला हवं' या ब्रीद वाक्याप्रमाणे आपल्या उदगीरचा विकास केला आहे.

सर्वसामान्यांसाठी वीरशैव लिंगायत भवनची निर्मीती केली. श्री गुरू हावगीस्वामी महाराज यांच्या मठाला निधी दिला. चौकी मठाला निधी देवुन मतदार संघातील विविध धार्मिक स्थळांना निधी दिला असल्याचे आ.बनसोडे यांनी सांगितले.

यावेळी तोगरीसह पंचक्रोशीतील भाविक भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.

******************************

Post a Comment

0 Comments