Type Here to Get Search Results !

तोंडचिर ग्रामपंचायतीचा पुढाकार : महिला दिनानिमित्त महिला ग्रामसभा व मोफत आरोग्य तपासणी शिबिर

 तोंडचिर ग्रामपंचायतीचा पुढाकार : महिला दिनानिमित्त महिला ग्रामसभा व मोफत आरोग्य तपासणी शिबिर


ॲनिमिया मुक्त गाव”च्या दिशेने तोंडचिरची वाटचाल; महिलांचा उत्स्फूर्त सहभाग




तोंडचिर : जागतिक महिला दिनानिमित्त तोंडचिर ग्रामपंचायतीच्या वतीने महिला ग्रामसभा तसेच मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानांतर्गत महिला आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमाला गावातील महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

गावातील महिलांचे आरोग्य चांगले राहावे तसेच “ॲनिमिया मुक्त गाव” ही संकल्पना प्रत्यक्षात उतरवण्यासाठी या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. शिबिरामध्ये महिलांची आरोग्य तपासणी करून त्यांना आवश्यक मार्गदर्शन करण्यात आले.

यावेळी गावातील महिलांना नियमित आरोग्य तपासणीचे महत्त्व, पोषणयुक्त आहार, तसेच रक्तअल्पता (ॲनिमिया) टाळण्यासाठी घ्यावयाची काळजी याबाबत माहिती देण्यात आली.

या कार्यक्रमास सरपंच, ग्रामसेवक खरात, डॉ. डोंगरगावकर, आशा वर्कर, ग्रामपंचायत सदस्य तसेच गावातील मोठ्या संख्येने महिला उपस्थित होत्या. ग्रामपंचायतीच्या या उपक्रमामुळे महिलांच्या आरोग्याबाबत जागरूकता निर्माण होत असून गाव ॲनिमिया मुक्त करण्याच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल टाकले जात असल्याचे मत उपस्थितांनी व्यक्त केले.

Post a Comment

0 Comments