Type Here to Get Search Results !

हिंगुलांबिका देवी मंदिर येथे मोफत सर्व रोग निदान शिबिर संपन्न

 हिंगुलांबिका देवी मंदिर येथे मोफत सर्व रोग निदान शिबिर संपन्न 



उदगीर : (श्रीधर जाधव )

आंतरराष्ट्रीय International Women's Day निमित्त भावसार क्षत्रिय समाज व उदगीर लॅबोरेटरी असोसिएशन (AIMLTA) यांच्या संयुक्त विद्यमाने श्री हिंगुलांबिका देवी मंदिर परिसरात मोफत सर्वरोग निदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिरास महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

शिबिराचे उद्घाटन उदगीर नगरपरिषदेच्या नूतन नगराध्यक्षा सौ. स्वाती ताई सचिन हुडे यांच्या हस्ते रिबीन कापून करण्यात आले. यावेळी उपनगराध्यक्षा सौ. शिंदे ताई, नगरसेविका सौ. अंबरखाने ताई तसेच स्वच्छता व आरोग्य सभापती राजकुमार हुडगे यांची प्रमुख उपस्थिती होती.

या प्रसंगी उदगीर लॅब असोसिएशन (AIMLTA) चे अध्यक्ष श्री बळवंत चिंचोलकर, डॉ. विजय बिरादार, डॉ. प्रशांत नवटके, डॉ. सुदाम बिरादार आणि डॉ. राधिका बिरादार आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमादरम्यान समाजाच्या वतीने सर्व मान्यवरांचा सत्कार करण्यात आला.

या मोफत आरोग्य शिबिरात सुमारे १२० महिलांनी रक्त तपासणीसाठी नमुने दिले. अल्प वेळात मोठ्या संख्येने महिलांनी सहभाग नोंदविल्याने आयोजकांनी समाधान व्यक्त केले. महिलांच्या आरोग्याबाबत जागरूकता वाढविण्याच्या उद्देशाने या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.

या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी सुनील अपसिंगेकर सर, समाजाचे उपाध्यक्ष अशोक बुलबुले, गुरु महिंद्रकर, शंकरराव महिंद्रकर, तुषार बुलबुले, वेदभूषण कालेकर, निवृत्ती गर्जे, प्रमोद गर्जे, किशन बेद्रे, गिरीश गर्जे, सौ. मीना ताई वायचाळकर, सौ. कविता ताई महिंद्रकर व सौ. कोमलताई बुलबुले यांनी विशेष परिश्रम घेतले.

महिला दिनानिमित्त आयोजित या उपक्रमामुळे महिलांच्या आरोग्य तपासणीस प्रोत्साहन मिळाल्याचे मत उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केले.

Post a Comment

0 Comments