Type Here to Get Search Results !

उदगीरात भव्य शिक्षक साहित्य संमेलन; “शिक्षणाला साहित्याची जोड आवश्यक” – संजय बनसोडे

 उदगीरात भव्य शिक्षक साहित्य संमेलन; “शिक्षणाला साहित्याची जोड आवश्यक” – संजय बनसोडे


  



उदगीर.....


सृजनशील शिक्षक म्हणजे समाजाचा शिल्पकार”आहे, शिक्षकांच्या लेखन-वाचन आणि अभिव्यक्तीला चालना मिळाली तर विद्यार्थ्यांमध्ये विचारशीलता, संवेदनशीलता आणि संस्कारांची बीजे रोवली जातात. साहित्य, शिक्षण व संस्कृती यांचा समन्वय घडविणारे असे उपक्रम ग्रामीण भागातील शिक्षकांना नवसंजीवनी देणारे ठरतात.


“आजच्या तंत्रज्ञानयुगातही मूल्याधिष्ठित शिक्षण देण्यासाठी शिक्षकांनी सर्जनशीलतेचा ध्यास घ्यावा,शिक्षण क्षेत्र केवळ पुस्तकांच्या चौकटीत न अडकता साहित्य, कला आणि संस्कृतीच्या संगमातून अधिक समृद्ध व्हावे, यासाठी शिक्षकांच्या सर्जनशीलतेला व्यासपीठ मिळणे अत्यावश्यक आहे, असे ठाम प्रतिपादन माजी मंत्री तथा विद्यमान आमदार संजय बनसोडे यांनी 


रंगकर्मी साहित्य, कला, क्रीडा प्रतिष्ठानच्या वतीने स्व. शिवराज पाटील चाकूरकर साहित्य नगरी, लिंकन इंटरनॅशनल स्कूल येथे आयोजित भव्य शिक्षक साहित्य संमेलनात ते उद्घाटक म्हणून बोलत आसताना काढले.


या संमेलनाध्यक्षपदी प्राचार्य डॉ. राजकुमार मस्के होते. विशेष उपस्थिती अभिनेत्री शीतल पाटील यांची लाभली. स्वागताध्यक्ष दिलीपकुमार राजेंद्र गायकवाड, प्राचार्य प्रमोद चौधरी, सिद्धेश्वर पाटील यांच्या सह विविध क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती लाभली.समारोप व पारितोषिक वितरण सोहळा


सायंकाळी ४.३० वाजता पार पडला. यावेळी प्राचार्य डॉ. राजकुमार मस्के, अभिनेत्री शीतल पाटील तसेच धनंजय गुंडसूरकर उपस्थित होते.


सूत्रसंचालन अनिता येलमटे, अ‍ॅड. महेश मळगे यांनी केले; तर आभारप्रदर्शन सचिन शिवशेटे व हणमंत केंद्रे यांनी मानले.


सायंकाळी ४.३० वाजता समारोप व पारितोषिक वितरण सोहळा पार पडला. या प्रतिष्ठणाचे अध्यक्ष प्रा. बिभीषण मद्देवाड, सचिव प्रा. ज्योती मद्देवाड, कार्यवाह रसुल पठाण, सहकार्यवाह प्रा. रामदास केदार व हणमंत केंद्रे,नागनाथ गुट्टे,रसुल पठाण, लक्ष्मण बेंबडे , दादाराव दाडगे, अॅड. महेश मळगे , नीता मोरे, सचिन शिवशेट्टे ,जहांगीर पटेल, ज्ञानेश्वर बडगे,संदीप निडवदे यांच्या परिश्रमातून संमेलन यशस्वी झाले.


शिक्षक, साहित्यप्रेमी व नागरिकांच्या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे उदगीरमध्ये सर्जनशीलतेचा हा सोहळा ऐतिहासिक ठरला.


परिसंवादातून ‘मराठी शाळांचा’ भविष्यवेध घेतला.


दुपारी दुसर्‍या सत्रात स्व. दि. ली. होळीकर व्यासपीठावर “मराठी शाळा : काल-आज आणि उद्या – आधुनिक शिक्षणातील तंत्रज्ञान, शिक्षकांची भूमिका व कर्तव्य” या विषयावर परिसंवाद रंगला.अध्यक्षस्थानी डॉ. श्रीपाद सि

Post a Comment

0 Comments