Type Here to Get Search Results !

दारूच्या नशेत पत्नीसोबत केला वाद ! पत्नीने केले कायमचे बाद !!

 दारूच्या नशेत पत्नीसोबत केला वाद !

पत्नीने केले कायमचे बाद !!



लातूर (एल पी उगील) मानवी जीवनात कधीकधी अचानकही काही घटना अशा काही घडून जातात की, त्यामुळे पुढील आयुष्यभर पश्चाताप करत बसावे लागते. विशेष करून व्यसनाधीन झालेल्या व्यक्तीच्या नशिबी तर असे अनेक प्रसंग येतात. कधी व्यसनाधीन व्यक्तीच्या हातून मोठमोठ्या चुका होतात, गुन्हे होतात. तर कधी कधी त्याने काढलेल्या वादामध्ये त्याचेच नुकसान होते. अशीच काहीशी घटना लातूर शहरातील कन्हेरी तांडा, नाईक चौक जवळ, तालुका लातूर येथे घडली आहे. या ठिकाणी राहणारा सिकंदर सिद्राम राठोड हा 49 वर्ष वयाचा तरुण हा त्याच्या पत्नीसोबत अर्थात कमलबाई सोबत राहत होता. सिकंदर यास दारू पिण्याचे व्यसन होते, आणि या व्यसनावरूनच पती-पत्नीमध्ये सतत भांडण होत असायचे. त्याच पद्धतीने तीन मार्च रोजी देखील सायंकाळी सात ते आठच्या दरम्यान सिकंदर हा घरी दारू पिऊन आला असता त्याचे आणि त्याच्या पत्नीचे भांडण सुरू झाले. सदर भांडणांमध्ये कमळाबाई हिच्या सोबत झटापट ही झाली. त्यामध्ये सिकंदर नशेच्या आहारी असल्यामुळे खाली पडला आणि पडल्याबरोबर त्याच्या डोक्याला मागील बाजूस गंभीर स्वरूपाची जखम झाली. तसेच या झटापटीमध्ये सिकंदरच्या छातीवरही मुक्का मार लागला होता. थोड्याच वेळात शिकंदर हा बेशुद्ध पडल्याचे कमलबाई हिच्या निदर्शनास आल्याबरोबर तिने सिकंदर याला लगेच सरकारी दवाखाना लातूर येथे दाखल करण्यासाठी घेऊन गेली. त्यावेळी तेथील वैद्यकीय सूत्रांनी सिकंदर हा मयत झाल्याची घोषित केले. या घटनेच्या संदर्भात शिवाजीनगर पोलीस ठाणे येथे शासकीय रुग्णालयातून दिलेल्या माहितीच्या आधारे गुन्हा नोंद करून कमलबाई हिला दोषी ठरवून शिवाजीनगर पोलीस ठाणे येथे गुन्हा रजिस्टर क्रमांक 98/26 कलम 105 भारतीय न्याय संहिता अन्वये सदोष मनुष्यवादाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी मयत सिकंदरची पत्नी कमलबाई हीला पोलिसांनी ताब्यात घेऊन पुढील तपास सुरू केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक एस एन चव्हाण हे करत आहेत.

Post a Comment

0 Comments