बोगस विद्यार्थी प्रवेशाच्या गुन्ह्यातील आरोपी निर्दोष
उदगीर (एल पी उगिले) उदगीर येथील दिलीप एकंबेकर अध्यापक विद्यालयातील सन 2002 ते 2003 या वर्षापासून सन 2007 ते 2008 या कालावधीत 15 विद्यार्थ्यांना बोगस प्रवेश दिल्या संदर्भात तत्कालीन सहसंचालक श्री रमेश पवार महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद पुणे, यांच्या आदेशानुसार विद्यालयाचे अध्यक्ष अशोक बापूसाहेब पाटील (मयत), सचिव अरुण बापूसाहेब पाटील आणि प्राचार्य रमेश चव्हाण (मयत) यांच्याविरुद्ध भारतीय दंड विधान संहिता 1860 नुसार कलम 420, 465, 467, 468, 461 व 34 प्रमाणे गुन्हा नोंदविण्यात आला होता.
सदर प्रकरणी फिर्यादी शेख नजरुद्दीन इस्माईल व इतर यांनी साक्ष दिली. परंतु सदर साक्षीमधून वरील कलमान्वये आरोपीवरील गुन्हा सिद्ध होऊ शकत नाही, म्हणून आरोपी अरुण बापूसाहेब पाटील यांना सदर प्रकरणातून उदगीर येथील प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी भालचंद्र रावसाहेब झेंडे यांनी निर्दोष मुक्त केले आहे. सदर प्रकरणात आरोपी अरुण बापूसाहेब पाटील यांच्यातर्फे विधीज्ञ संघाचे उपाध्यक्ष ॲड. गीतानंद गोविंद अक्कनगिरे यांनी बाजू मांडली. त्यांना ॲड. बाळासाहेब गंगाधर पाटील यांनी सहकार्य केले.
उदगीर शहरात अत्यंत गाजलेल्या आणि बहुचर्चित झालेल्या या प्रकरणी आरोपी निर्दोष मुक्त झाल्याबद्दल शैक्षणिक क्षेत्रामध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

Post a Comment
0 Comments