"इरा किड्स ए प्ले स्कूल" चे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न
उदगीर (एल पी उगिले) उदगीर शहरालगत असलेल्या निडेबन येथील इरा किड्स प्ले स्कूल चे वार्षिक स्नेहसंमेलन उदगीर येथील भाग्यलक्ष्मी मंगल कार्यालय येथे अत्यंत उत्साहपूर्ण व आनंदी वातावरणात पार पडले.
या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून शिवराज थोटे, बालाजी धमनसुरे, नगरसेवक विजय निटुरे, नगरसेवक बाळासाहेब पाटोदे, अरविंद बिरादार, सतीश पाटील मानकीकर तसेच सौ. कल्पना मुसने, सौ नीता मोरे, प्रा. अनंत पाटील, राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त आदर्श शिक्षक विश्वनाथ मुडपे यांची उपस्थिती होती.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष गणेश बिरादार येनकीकर हे होते. कार्यक्रमाच्या प्रारंभी दीपप्रज्वलन व स्वागत समारंभ संपन्न झाला. नंतर चिमुकल्या विद्यार्थ्यांनी विविध गुणदर्शन सादर करत सांस्कृतिक कार्यक्रम सादर केला. यामध्ये नृत्य, देशभक्तीपर गीत, अभिनय व समूह सादरीकरणातून मुलांनी आपल्या सुप्त कलागुणांचे अप्रतिम असे दर्शन घडवले. रंगीबेरंगी पोशाखात सादर केलेली सुंदर नयन रम्य व मनमोहून टाकणारी सादरीकरणे उपस्थित प्रेक्षकांच्या विशेष कौतुकाचा विषय ठरले. कार्यक्रमात सहभागी झालेल्या चिमुकल्या मुलांनी अत्यंत आत्मविश्वासाने व उत्साहाने उत्कृष्ट सादरीकरण केले. त्यांच्या प्रत्येक सादरीकरणाला उपस्थित पालक व पाहुण्याकडून टाळ्यांचा कडकडाट मिळत होता. या संपूर्ण कार्यक्रमासाठी पालकांनी मोलाची साथ दिली असून मुलांच्या तयारी पासून ते सादरीकरणा पर्यंत त्यांचे योगदान उल्लेखनीय ठरले आहे.
विद्यार्थ्यांच्या ड्रेसिंग व सादरीकरणा साठी विशेष मेहनत घेतलेल्या सौ. सुजाता कोणाळे यांचेही कौतुक करण्यात आले. त्यांच्या मार्गदर्शनामुळे मुलांची सादरीकरणे अधिक आकर्षक व प्रभावी ठरली. शाळेच्या शैक्षणिक व सह शैक्षणिक प्रगती बाबत प्राचार्य जयश्री बिरादार, उप प्राचार्य रेश्मा देशमाने यांनी आपल्या मनोगतातून शाळेच्या उपक्रमांची माहिती दिली. यावेळी विश्वनाथ मूड प यांचेही मार्गदर्शन झाले. सूत्रसंचालन डी एस बिरादार यांनी अत्यंत प्रभावी व जोश पूर्ण शैलीत केले.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संपूर्ण शिक्षक, कर्मचारी वर्ग तसेच पालक वर्ग यांनी परिश्रम घेतले. स्नेहसंमेलना मुळे विद्यार्थ्यांमधील आत्मविश्वास व सर्जनशीलता विकसित होते. संस्काराचे बीजारोपण अधिक दृढ झाले पाहिजे अशा भावना पालकांनी व्यक्त केल्या. तसेच या उपक्रमाबद्दल समाधान मानले.

Post a Comment
0 Comments