वाढवणा जिल्हा परिषद गटामध्ये रामभाऊ तिरुके यांना देव माणूस मानणाऱ्यांची संख्या वाढली
उदगीर (प्रतिनिधी)
उदगीर विधानसभा मतदार संघच नव्हे तर संपूर्ण मराठवाड्यामध्ये देव माणूस म्हणून ओळखला जाणारा देवदूत रामभाऊ तिरुके यांच्या समाज कार्याला प्राधान्य देऊन तळागाळातील कार्यकर्ते त्यांच्या प्रचारासाठी जीवाचे रान करून फिरू लागले आहेत. जाहीर प्रचाराच्या शेवटच्या दिवशी वाढवणा, हळी हंडरगुळी या मोठ्या गावातून उदगीर विधानसभा मतदारसंघाचे भाग्यविधाते माजी मंत्री तथा उदगीर विधानसभा मतदारसंघाचे आमदार संजयभाऊ बनसोडे यांच्या नेतृत्वाखाली रोड शो करण्यात आला. यामध्ये हजारोंनी सहभाग घेऊन आम्ही रामभाऊ तिरुके आणि त्यांच्या सहकार्या सोबत तसेच इतर पंचायत समितीतील सदस्या सोबत आहोत. अशी जाहीर ग्वाही लोकांनी याप्रसंगी दिली. संजयभाऊ बनसोडे यांनी केलेल्या विकास कामाची पावती आणि देवदूत असलेल्या देव माणसाच्या सोबत आम्ही आहोत. रामभाऊ तिरुके म्हणजे अक्षरशः देव माणूस आहे, मात्र काही राक्षसी प्रवृत्ती त्यांच्याबद्दल अपप्रचार करत आहेत. अर्थकारणातून अशी विकृती करणारी प्रवृत्ती निर्माण झाली आहे. वास्तविक पाहता रामभाऊ सारखा समाजसेवेचा वसा घेतलेला लोकनेता या जिल्हा परिषद गटाला भेटला, हे सौभाग्य समजावे. अशा पद्धतीचे विचार उदगीर विधानसभा मतदारसंघाचे भाग्यविधाते आ. संजयभाऊ बनसोडे यांनी व्यक्त केले.
रामभाऊ तिरके हे अत्यंत कर्तव्यदक्ष आणि गोरगरिबांचे कैवारी म्हणून काम करणारे, कोणाचाही फोन आला तर त्या लोकांना मदतीसाठी धावून जाणारे कार्यकर्ते आहेत. ते स्वतःला नेता समजत नाहीत तर जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष असताना अत्यंत ताकतीने त्यांनी काम केले. पण कधीही गर्व बाळगला नाही. हे मला अत्यंत आवडणारे व्यक्तिमत्व आहे. असे विचार आ. संजय बनसोडे यांनी व्यक्त केले. याप्रसंगी वाढवणा हद्दीमध्ये असलेल्या गोरगरीब जनतेने रामभाऊ ला निवडून द्यायचा निर्धार करून रॅलीमध्ये सहभाग नोंदवला.
सर्वसामान्य माणसांनी आपल्या भावना व्यक्त करताना रामभाऊंनी आम्हाला प्रचंड मदत केलेली आहे, शासनाच्या वैद्यकीय सुविधा आणि लोककल्याणकारी योजना लाभार्थ्यापर्यंत मिळाल्या पाहिजेत, यासाठी रामभाऊंनी स्वखर्चाने मुंबईपर्यंत धाव घेऊन कामे केली आहेत. याचे आम्ही साक्षीदार आहोत. अशा पद्धतीची ग्वाही माजी मंत्री तथा आमदार संजय बनसोडे यांच्यासमोर शेकडो लाभार्थ्यांनी बोलून दाखवले.
या सर्व प्रकारामुळे सर्वसामान्य जनतेचे डोळे फिरले आहे. वाढवणा मतदारसंघच नव्हे तर रामचंद्र तिरुके यांच्या समाजसेवेचा परिणाम आजूबाजूच्या मतदारसंघातील होऊ लागला आहे. रामभाऊ तिरुके यांचा आदर्श घेऊन डॉ. दीपक सोमवंशी यांनी काम करावे, अशी अपेक्षा त्या पदयात्रेतील काही लोकांनी बोलून दाखवली. डॉ. दीपक सोमवंशी हे गोरगरिबाचे मसीहा आहेत. आता ते राजकारणात येत असतील तर रामभाऊ सारखे लोककल्याणकारी योजना लोकांना मिळाल्या पाहिजेत, यासाठी स्वखर्चाने मुंबईपर्यंत जाण्याची तयारी ठेवली पाहिजे. असेही विचार व्यक्त केले गेले. यावेळी बोलताना आ. संजय बनसोडे यांनी सांगितले की, राष्ट्रवादी काँग्रेसने अत्यंत विद्वान उच्चविद्या विभूषित अशीच माणसं निवडली आहेत. त्यामुळे कोण काय बोलतो याकडे फारसे लक्ष द्यायची गरज नाही. लोकांची सेवा करणाऱ्या माणसांना निवडून द्या. लोकसेवेची जाणीव असलेल्या माणसाला निवडून द्या. तुमच्या घरापर्यंत येऊन तुमची सुखदुःखाची जपवणूक करणाऱ्या माणसाला निवडून द्या, असे आवाहन केले. याप्रसंगी भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सर्व कार्यकर्त्यांनी एकजुटीने भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या युतीच्या सर्व उमेदवारांना निवडून देण्याची शपथ घेतली.

Post a Comment
0 Comments