Type Here to Get Search Results !

निवडणुकीच्या दरम्यान आदर्श आचारसंहितेसह कायदा आणि सुव्यवस्था कठोरपणे पाळली जाणार - पोलीस प्रशासन

 निवडणुकीच्या दरम्यान आदर्श आचारसंहितेसह कायदा आणि सुव्यवस्था कठोरपणे पाळली जाणार - पोलीस प्रशासन



लातूर (एल पी उगिले) जिल्ह्यातील

जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुका शांततापूर्ण व निर्भय वातावरणात पार पाडण्यासाठी लातूर पोलीस दलाने व्यापक, काटेकोर व बहुआयामी बंदोबस्ताची तयारी केली आहे.या बंदोबस्ताचा उद्देश मतदारांना निर्भयपणे मतदानाचा हक्क बजावता यावा, तसेच कोणतीही अनुचित घटना टाळणे हा आहे. कोणीही आदर्श आचारसंहितेचा भंग करू नये, केल्यास कायदेशीर कारवाई केली जाईल असा इशारा पोलीस प्रशासनाने दिला आहे.

निवडणूक प्रक्रियेदरम्यान जिल्ह्याचे संवेदनशील आणि अतिसंवेदनशील भाग ओळखून तिथे अतिरिक्त बंदोबस्त, सतत गस्त, निगराणी आणि तत्काळ प्रतिसाद व्यवस्था राबवण्यात आली आहे. संभाव्य तणावपूर्ण परिस्थितींवर त्वरित नियंत्रण मिळवण्यासाठी सर्व यंत्रणा सज्ज ठेवण्यात आल्या आहेत.

लातूर जिल्ह्यात निवडणूक रचना पुढीलप्रमाणे आहे:

पंचायत समिती गण: 118, साठी एकूण मतदान केंद्रे: 1056 आहेत. तर मतदान बूथ: 1753 वर मतदान होणार आहे. मतदान बूथ च्या परिसरामध्ये व्यवस्थित बंदोबस्त असणार आहे.प्रत्येक मतदान केंद्रावर आवश्यकतेनुसार पोलीस बंदोबस्त तैनात केला जाईल, आणि मतदान प्रक्रियेच्या संपूर्ण कालावधीत कडक सुरक्षा राखली जाईल. निवडणूक पर्यवेक्षण अधिकारी म्हणून मंगेश चव्हाण, अपर पोलीस अधीक्षक, लातूर यांची नियुक्ती करण्यात आली असून त्यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व अधिकारी व कर्मचारी कार्यरत राहतील.जिल्ह्यातील पोलीस मनुष्यबळाचे विवरण:उपविभागीय पोलीस अधिकारी : 8 आहेत तपोलीस निरीक्षक : 18 असतील, त्यांच्यासोबतच पोलीस उपनिरीक्षक : 125 राहणार आहेत. तसेच पोलीस अंमलदार : 1945 नियुक्त करण्यात आले आहेत.होमगार्ड : 3080 राहतील. विशेष दक्षता म्हणून एस आर पी : 2 कंपन्या तैनात करण्यात आले आहेत.

तसेच बाहेरून वर्धा, वाशिम, अमरावती, नांदेड, मुंबई, नागपूर, चंद्रपूर, हिंगोली व भंडारा येथून अतिरिक्त पोलीस अधिकारी, अंमलदार आणि होमगार्ड तैनात करण्यात आले आहेत. प्रत्येक पंचायत समिती गणसाठी एसआरपीएफ चे 2 सेक्शन आणि लातूर ग्रामीणसाठी 1 एसआरपीएफ प्लाटून तैनात आहेत. निवडणूक काळात अनुचित घटना, वाद किंवा कायदा व सुव्यवस्था भंग होताच त्वरित प्रतिसाद देण्यासाठी 4 स्ट्राइकिंग पथके सतत पोलीस नियंत्रण कक्षात तैनात आहेत. तसेच रूट मार्च आयोजित करून नागरिकांमध्ये विश्वासार्ह वातावरण निर्माण करण्यात आले आहे.

लातूर पोलीस दलाने नागरिक व मतदारांना आवाहन केले आहे की, शांतता राखा, अफवांवर विश्वास ठेवू नका, आणि कोणताही कायदा भंग करणारा प्रकार आढळल्यास तत्काळ पोलीस प्रशासनाला कळवा.निर्भयपणे मतदानाचा हक्क बजावण्यासाठी पोलीस प्रशासन सदैव सज्ज आहे. आणि कायदा भंग करणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई केली जाईल.

Post a Comment

0 Comments