Type Here to Get Search Results !

महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालयात बारावीच्या विद्यार्थ्यांना निरोप

 महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालयात बारावीच्या विद्यार्थ्यांना निरोप



उदगीर (एल पी उगिले) येथील महाराष्ट्र उदयगिरी कनिष्ठ महाविद्यालयात इयत्ता बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी निरोप व शुभेच्छा समारंभ उत्साहात पार पडला. अध्यक्षस्थानी उपप्राचार्य एस. जी. कोडचे होते. मंचावर पर्यवेक्षक प्रा. एस. व्ही. मूडपे व परीक्षाप्रमुख प्रा. पी. वाय. जालनापुरकर यांची उपस्थिती होती. या वेळी बोलताना प्रा. मूडपे म्हणाले, "आजचा विद्यार्थी उद्याचा भारताचा जबाबदार नागरिक आहे. भविष्यातील संधींबाबत त्यांनी मौलिक मार्गदर्शन केले." समारोपात प्रा. कोडचे म्हणाले, "यश प्राप्तीसाठी विद्यार्थ्यांनी अभ्यासात सातत्य, शिस्त व कठोर परिश्रम करणे आवश्यक आहे." विद्यार्थ्यांच्या वतीने हर्षवर्धन कांबळे, अनिकेत येलमटे, चैतन्य कांबळे, शिवानी कंटे व प्रतीक्षा सूर्यवंशी यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी वर्षभरातील विविध परीक्षांतील यशस्वी विद्यार्थ्यांचा ग्रंथ भेट व पुष्पहाराने गौरव करण्यात आला. सूत्रसंचालन प्रा. प्रवीण जाहुरे व प्रा. सचिन कांबळे यांनी तर आभार प्रा. नागनाथ खांडेकर यांनी मानले.

Post a Comment

0 Comments