Type Here to Get Search Results !

ऑपरेशन ऑल आऊट’ अंतर्गत लातूर शहरात कडक नाकाबंदी

 ‘ऑपरेशन ऑल आऊट’ अंतर्गत लातूर शहरात कडक नाकाबंदी





  लातूर (एल पी उगीले)शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखणे तसेच नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण करण्याच्या उद्देशाने दिनांक २१ फेब्रुवारी २०२६ रोजी रात्री लातूर जिल्हा पोलिसांकडून शहरात ‘ऑपरेशन ऑल आऊट’ अंतर्गत विशेष मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेदरम्यान शहरातील विविध ठिकाणी अचानक नाकेबंदी, वाहन तपासणी, संशयितांची चौकशी तसेच वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली.

             ही मोहीम पोलीस अधीक्षक अमोल तांबे व अपर पोलीस अधीक्षक श्री. मंगेश चव्हाण यांच्या मार्गदर्शना खाली पार पडली. शहरातील गांधी चौक, शिवाजीनगर, विवेकानंद चौक व एमआयडीसी या चारही पोलीस ठाण्यांच्या हद्दीत एकाच वेळी नाकेबंदी व तपासणी मोहीम राबविण्यात आली. ऑपरेशन ऑल आऊट’ अंतर्गत नाकेबंदी दरम्यान हुल्लडबाजी करत वाहन चालवणे, ट्रिपल सीट मोटार सायकल चालवणे, विनापरवाना वाहन चालवणे तसेच इतर वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांवर कारवाई करण्यात आली. या मोहिमेदरम्यान एकूण २२ प्रकरणे नोंदवून सुमारे ३५,०००/- रुपयांचा दंड आकारण्यात करण्यात आला.

           पोलीस स्टेशन एमआयडीसी हद्दीत देखील व्यापक वाहन तपासणी मोहीम राबविण्यात आली. या कारवाईदरम्यान एकूण २८ वाहनांवर कारवाई करण्यात आली. १७,४००/- रुपये दंड आकारण्यात करण्यात आला. तसेच फटाका सायलेन्सर लावलेल्या तीन बुलेट मोटारसायकली व ट्रिपल सीट चालविणारी तीन वाहने पुढील कारवाईसाठी पोलीस स्टेशन येथे डिटेन करण्यात आले असून पोलीस ठाणे शिवाजीनगर हद्दीत नाकाबंदी दरम्यान २८ वाहणावर कार्यवाही करूण २४,००० रू दंड आकारण्यात आला व पोलीस ठाणे विवेकानंद चौक यांनी मोटर वाहन कायद्यान्वये आठ केसेस करून 5500 दंड आकारला तसेच अवैधपणे शस्त्र घेऊन फिरणाऱ्या विरुद्ध शस्त्र अधिनियम प्रमाणे एक गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

        मोहीमेअंतर्गत शहरातील प्रमुख चौक, वर्दळीचे रस्ते तसेच शहराच्या प्रवेशद्वारांवर कडक नाकेबंदी करण्यात आली. संशयास्पद हालचाली करणाऱ्या व्यक्तींची तपासणी करण्यात आली. रेकॉर्डवरील गुन्हेगार तसेच तडीपार आरोपींवर विशेष लक्ष ठेवण्यात आले. तसेच विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने काही ट्युशन परिसरात गस्त वाढविण्यात आली. वाहतूक नियमांचे पालन व्हावे, यासाठी मद्यपान करून वाहन चालवणाऱ्यांची तपासणी तसेच नियमबाह्य बदल केलेल्या वाहनांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली.

लातूर जिल्हा पोलीस नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी सतत प्रयत्नशील असून भविष्यातही अशा प्रकारच्या अचानक नाकेबंदी, गस्त व विशेष मोहिमा राबविण्यात येणार आहेत. 

                नागरिकांनी वाहतूक नियमांचे पालन करावे तसेच संशयास्पद बाबींची माहिती पोलिसांना द्यावी, असे आवाहन लातूर पोलिसांकडून करण्यात आले आहे.

Post a Comment

0 Comments