छत्रपती शिवाजीराजे महाविद्यालयाला SQAAF अंतर्गत अ+ श्रेणी प्राप्त
उदगीर, छत्रपती शिवाजीराजे महाविद्यालयास शाळा गुणवत्ता मूल्यांकन व आश्वासन आराखडा अंतर्गत बाह्य मूल्यांकनात अ+ श्रेणी प्राप्त करून राज्यातील गुणवत्तापूर्ण शैक्षणिक संस्थेमध्ये महाविद्यालयाने आपले स्थान अधिक भक्कम केले आहे.
महाराष्ट्र शासनाच्या वतीने राज्यातील सर्व शाळांचे मूल्यांकन करण्यासाठी राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे येथे राज्य शाळा मानक प्राधिकरण कक्षाची स्थापना करण्यात आली होती. त्यानुसार सन २०२४- -२०२५ मध्ये राज्यातील १,०२६७५ शाळांनी स्वयं मूल्यांकन पूर्ण केले. स्वयं मूल्यांकनात सर्वाधिक गुण मिळवणाऱ्या शाळापैकी सन २०२५- २०२६ मध्ये १०,७७२ शाळांची बाह्य मूल्यांकनासाठी निवड करण्यात आली होती त्यापैकी १०,६४४ शाळांचे बाह्य मूल्यांकन पूर्ण झाले.
या प्रक्रियेत राज्यातील निवड झालेल्या शाळांपैकी केवळ ४२९ शाळांना अ + श्रेणी प्राप्त झाली असून त्यामध्ये छत्रपती शिवाजीराजे कनिष्ठ महाविद्यालय जिल्ह्यातील एक शैक्षणिक दृष्ट्या नामवंत महाविद्यालय ठरले आहे. महाविद्यालयातील सुसज्ज ग्रंथालय, विद्यार्थ्यांना पिण्यासाठी आरओचे पाणी ,स्मार्ट बोर्डद्वारे अध्यापन, विद्यार्थ्यांसाठी विविध उपक्रम, तज्ज्ञ प्राध्यापकांचे मार्गदर्शन, विविध सराव परीक्षांचे आयोजन, विविध परीक्षेसंबंधी समुपदेशन यासारखे उपक्रम यामुळे विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास साधला जात आहे.
या उपक्रमांचे फलित म्हणून अनेक विद्यार्थ्यांनी कला, क्रीडा ,वक्तृत्व तसेच बारावी बोर्ड परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन केले आहे. उच्चविद्याविभूषित शिक्षक वर्ग व गुणवत्ता पूर्ण शैक्षणिक वातावरण यामुळेच महाविद्यालयास अ+ श्रेणी बहाल झाली आहे. याबद्दल
किसान शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष श्री. श्रीरंगराव पाटील एकंबेकर, उपाध्यक्ष माधवराव पाटील, सचिव श्री. पी टी शिंदे सहसचिव श्री. हिरागीर गिरी,कोषाध्यक्ष श्री. गुंडेराव पाटील, पृथ्वीराज अशोकरावजी पाटील एकंबेकर वमाजी प्राचार्य प्रा. डॉ.अरविंद नवले यांनी प्राचार्य डॉ.रामकिशन मांजरे ,आयक्यूएसी समन्वयक डॉ. विष्णू पवार पर्यवेक्षक प्रा. राम गिरी SQAAF समिती समन्वयक प्रा. डी. टी. बिरादार ,स्टाफ सचिव प्रा. एम. सी पाटील तसेच समितीचे सर्व सदस्य प्राध्यापक व कार्यालयीन कर्मचाऱ्यांचे अभिनंदन केले आहे.

Post a Comment
0 Comments