Type Here to Get Search Results !

तोंडचीर येथे आयडीबीआय बँकेकडून सोलार प्रकल्प, वॉटर फिल्टर व डिजिटल बोर्डचे लोकार्पण

 तोंडचीर येथे आयडीबीआय बँकेकडून सोलार प्रकल्प, वॉटर फिल्टर व डिजिटल बोर्डचे लोकार्पण



उदगीर : उदगीर तालुक्यातील मौजे तोंडचीर येथील जिल्हा परिषद शाळा व आरोग्य उपकेंद्र येथे IDBI Bank शाखा उदगीर यांच्या सामाजिक बांधिलकी उपक्रमांतर्गत ५ कि.वॅ. क्षमतेच्या सोलार प्रकल्पासह वॉटर फिल्टर व डिजिटल बोर्डचे लोकार्पण करण्यात आले. पंचायत समिती उदगीरचे गटविकास अधिकारी मा. श्री. नरेंद्र मेडेवार यांच्या हस्ते या उपक्रमाचे उद्घाटन पार पडले.

या उपक्रमामुळे शाळेला अखंड वीजपुरवठा उपलब्ध होणार असून विद्यार्थ्यांना डिजिटल माध्यमातून आधुनिक शिक्षणाची सुविधा मिळणार आहे. तसेच आरोग्य उपकेंद्रात शुद्ध पिण्याच्या पाण्याची सोय झाल्याने ग्रामस्थांना मोठा दिलासा मिळणार आहे.

कार्यक्रमास आयडीबीआय बँकेचे शाखा अधिकारी अरुण कवाळे, सहाय्यक गटविकास अधिकारी स्वामी साहेब, डॉ. श्रद्धा डोणगावकर, आरोग्य विस्तार अधिकारी वाघमारे साहेब, ग्रामपंचायत अधिकारी खरात साहेब, सरपंच, ग्रामपंचायत सदस्य सुभाष भुताळे, मुख्याध्यापक नेलगे सर, चामेसर तसेच सर्व शिक्षक व ग्रामस्थ उपस्थित होते.

यावेळी मान्यवरांनी बँकेच्या सामाजिक उपक्रमाचे कौतुक करत गावाच्या शैक्षणिक व आरोग्य सुविधांच्या उन्नतीसाठी हा उपक्रम महत्त्वाचा ठरेल, असा विश्वास व्यक्त केला.

Post a Comment

0 Comments