वझर येथे शिवजयंती उत्साहात साजरी; मान्यवरांच्या हस्ते ध्वजारोहण व पुष्पांजली
वझर(प्रतिनिधी) – महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती वझर येथे मोठ्या उत्साहात आणि भक्तिभावाने साजरी करण्यात आली. ग्रामस्थांच्या उपस्थितीत शिवरायांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले तसेच ध्वजारोहणाचा कार्यक्रमही पार पडला.
यावर्षीच्या शिवजयंती उत्सव समितीच्या अध्यक्षपदी बाळासाहेब संगेकर तर उपाध्यक्षपदी बाळूभाऊ बेंबरे आणि सचिवपदी शामराव कुडले यांनी जबाबदारी सांभाळली. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी शुभम शिंदे, सुमित बेंबरे, संकेत बेंबरे, राजू पाटील बिरादार, गोपाल पाटील बिरादार, सुजल जाधव, नामदेव पळनिटकर, विठ्ठल वजिरे, कुमार तात्या नवघरे, किरण पाटील, दिगंबरराव सावळे, राजू सावळे, मारोतराव मुंडे, ज्ञानेश्वर डावरगावे, बालाजी भेंडेगावे, ज्ञानेश्वर वजीरे आदींनी विशेष परिश्रम घेतले.
शिवजयंतीनिमित्त आयोजित ध्वजारोहण कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान शांतारामजी पाटील पळनिटकर यांनी भूषविले. यावेळी शरद पाटील वाघमोडे, विजय पाटील, उपसरपंच नरसिंग गुरुजी चोरमले, माजी सरपंच लक्ष्मणरावजी भेंडेगाव, नागनाथ सगर, वहीत गुरुजी, कृष्ण सावकार बच्चेवार, जळबा गायकवाड, संजय गायकवाड, विश्वनाथ बारुळे, धनाजी दादा लवटे, आनंद पांढरे, मियाँसाब पिरमले आदी मान्यवरांचा सत्कार करण्यात आला.
शिवलिंग कार्यक्रम तसेच इतर धार्मिक व सांस्कृतिक उपक्रम पार पाडण्यासाठी राजकुमार जाधव, राहुल जाधव, राम सावळे, बळीराम, लक्ष्मण, तुकाराम यांच्यासह वझर गावातील सर्व नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.
संपूर्ण गावात शिवमय वातावरण निर्माण झाले असून “जय भवानी, जय शिवाजी”च्या घोषणांनी परिसर दुमदुमून गेला. कार्यक्रम यशस्वी पार पाडल्याबद्दल आयोजकांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

Post a Comment
0 Comments