माजी कॅबिनेट मंत्री आ.संजय बनसोडे यांच्या शुभहस्ते गोपाळ जोशी यांना राज्यस्तरीय कला गौरव पुरस्कार प्रदान
उदगीर/ प्रतिनिधी
येथील लालबहादूर शास्त्री माध्यमिक विद्यालय उदगीर येथील माजी संगीत शिक्षक तथा श्री.जयदीप सेवाभावी शिक्षण संस्था उदगीर चे उपाध्यक्ष श्री. गोपाळ नरसिंगराव जोशी यांना त्यांच्या कलाक्षेत्रासह, शैक्षणिक, सांस्कृतिक,सामाजिक,उत्कृष्ट कार्याची दखल घेऊन 2026 या वर्षीचा राज्यस्तरीय कला-गौरव पुरस्कार नुकताच महाराष्ट्र राज्याचे माजी कॅबिनेट मंत्री उदगीर -जळकोट विधानसभा मतदारसंघाचे विकास पुरुष आ. संजय बनसोडे यांच्या शुभहस्ते गोपाळ जोशी व छाया जोशी या दोघांचा राज्यस्तरीय कलागौरव पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला. यावेळी रुबाब चित्रपटातील अभिनेत्री शितल पाटील,नूतन लातूर जिल्हा परिषद सदस्य ज्ञानेश्वर बिरादार, महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. राजकुमार मस्के,रंगकर्मी प्रतिष्ठानचे अध्यक्ष बिभीषण मद्देवाड,सचिव ज्योती मद्देवाड, भाजपाचे नेते दिलीप गायकवाड, प्राचार्य प्रमोद चौधरी,कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती सिद्धेश्वर पाटील,श्री.जयदीप सेवाभावी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष ज्ञानेश्वर जवळे,पंचायत समिती सदस्य प्रशांत पाटील यांच्यासह अनेक मान्यवरांची व्यासपीठावर उपस्थिती होती.गोपाळ जोशी यांना राज्यस्तरीय कला गौरव पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे .

Post a Comment
0 Comments