Type Here to Get Search Results !

दक्षिण मध्य रेल्वेच्या महाप्रबंधकाचा उदगीर दौरा : विविध मागण्या मंजुरीकडे लक्ष

 दक्षिण मध्य रेल्वेच्या महाप्रबंधकाचा उदगीर दौरा : विविध मागण्या मंजुरीकडे लक्ष    




 उदगीर (प्रतिनिधी) दक्षिण मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक संजयकुमार श्रीवास्तव हे विभागीय व्यवस्थापक श्री गोपालकृष्णनसह आपल्या सर्व उच्यस्पद अधिकाऱ्यांसोबत दिनांक 17 फेब्रुवारी 2026 रोजी सुरक्षा पाहणी दौऱ्यावर दुपारी 12 वाजता येणार आहेत.

या दौऱ्यात माजी मंत्री संजय बनसोडे, खासदार डॉ. शिवाजी काळगे यांच्यासह रेल्वे संघर्ष समितीचे अध्यक्ष रमेश आंबरखाने, नगराध्यक्ष सौ.स्वाती सचिन हुडे व सामाजिक संस्थांचे पदाधिकारी, पत्रकार उपस्थित राहणार आहेत. संजय कुमार श्रीवास्तव यांनी 11 जुलै 2025 रोजी दक्षिण मध्य रेलवे (SCR) च्या महाप्रबंधक (GM) पदाचा पदभार स्वीकारला असून त्यांच्या या भागात पहिल्यांदाच सुरक्षा पाहणी दौऱ्यास येत आहेत.

या दौऱ्यात हैदराबाद-पुणे-मुंबई वंदे भारत स्लीपर वर्जन, हैदराबाद इंटरसिटी सोबत स्टेशन विकासाबाबत चर्चा होईल.

संघर्ष समितीच्या माध्यमातून बेलसकरगा येथे नवीन क्रॉसिंग स्टेशन, लातूर रोड व परळी येथे नवीन बायपास लाईन,विकाराबाद परळी वैजनाथ 265 किमी दुहेरीकरण लाईन मंजूर असून त्यास गती देण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील.

अनेक रेल्वे प्रस्तावित असून त्या लवकरात लवकर चालू करण्याचा प्रयत्न या दौऱ्यात करण्यात येणार आहे. हैदराबाद - अहमदाबाद, सिकंदराबाद - जम्मूतवी, मछलीपटनम - परळी,अमरावती - तिरुपती रेल्वे सुरू करण्याचा समावेश आहे.

स्टेशन विकास अंतर्गत RPF रेल्वे पोलिस स्टेशन, दुसरा प्लॅटफॉर्म निवारा शेड, वेटींग हॉल, गुड्स गोडाऊन, अमृत भारत स्टेशन योजने मध्ये उदगीर आणि लातूर रोडचा समावेश करावा अशी मागणी होईल.

या महत्वाच्या दौऱ्यात लोकप्रतिनिधींच्या उपस्थितीत अनेक मागण्याचे निरसन होण्याची शक्यता असून त्या अनुषंगाने दौऱ्याला महत्व आले असल्याची माहिती उदगीर रेल्वे संघर्ष समिती सचिव मोतीलाल डोइजोडे यांनी दिली आहे.

Post a Comment

0 Comments