माता भीमाई यांच्या जयंतीनिमित्त उदगीरात अभिवादन
उदगीर/ प्रतिनिधी
भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या मातोश्री माता भीमाई यांची जयंती दि. १४ फेब्रुवारी रोजी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी जिल्हा परिषदेत निवडुण आलेले बोध्द समाजाचे चार सदस्यांचा सत्कार करण्यात आला. शिवाय भीमाई यांच्या १७२ व्या जयंतीनिमित्त अभिवादन करण्यात आले.
भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ माता भीमाई यांच्या जयंतीनिमित्त दि. १४ रोजी सकाळी ११ वा. अभिवादन कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले. यावेळी उपस्थित आंबेडकरी समाजाच्या वतीने सामुहिक बुध्द- धम्म वंदना घेण्यात आली. यावेळी बाबासाहेब सुर्यवंशी, विद्यासागर डोरनाळीकर
यांच्यासह जिल्हा परिषद सदस्य डाॅ. दिपक सोमवंशी, उषाताई कांबळे, मुकेश भालेराव, दिलीप मटके उपस्थित होते. नवनियुक्त जि.प सदस्यांचा सत्कार करण्यात आले. यावेळी डाॅ. गोविंद सोनकांबळे, संजय काळे, नगरसेवक व्यंकट बोईनवाड, धोंडीरामजी वाघमारे, अविनाश गायकवाड, बुद्धभूषण बाणाटे, धनाजी बनसोडे, विद्यासागर भाले, जे एस उमरगेकर, बंटी घोरपडे, योगेश मेघे, सुनील पकोळे, बालाजी गायकवाड, डॉ. ज्योतीताई सोमवंशी, जावेद लोणीकर, राहुल मटके, यांच्यासह अनेक समाज बांधव उपस्थित होते. माता भीमाई यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन कार्यक्रमाचे नियोजन बाबासाहेब सुर्यवंशी यांनी केले होते.

Post a Comment
0 Comments