बजरंग दलाच्या मागणीला यश
टुक्कारगीरीवर पोलिस प्रशासनाकडून कारवाईला सुरुवात
उदगीर शहर शिक्षणाचे माहेर घर असल्यामुळे तीन राज्याच्या सिमावर्ती ग्रामीण भागातील विद्यार्थी, विद्याथींनी शिक्षणासाठी येतात . पण शहरातील कांही धर्मांद टुक्कार शहरातील प्रमुख महाविद्यालयाच्या प्रवेशद्वारासमोर विनाकारण उभारून भांडणे काढणे, मुलीची छेड काढणे, लव्ह जिहाद प्रकरणाला चालना देणे आदी चुकीच्या घटनांना प्रोत्साहन देत होते यामुळे मुलींना शिक्षणासाठी अडचण निर्माण होत होती . बजरंग दलाच्या वतीने कांही महिन्यापूर्वी पोलिस प्रशासनास पथक नेमण्यासाठी निवेदन दिले होते पण पथक नेमूनही जास्त काळ चालू शकले नाही . रिक्षाचालक व टुकार पुन्हा हौदोस घालण्यास सुरुवात केली यामुळे बजरंग दलच्या वतीने 26 डिसेंबर 2025 रोजी निवेदन देऊन कार्यवाही नाही झाल्यास बजरंग दल स्वतः रस्त्यावर उतरून आंदोलन करू असा इशारा इशारा दिला होता . यावर सक्त कार्यवाही करण्यासाठी शहर पोलिस निरीक्षक दिलीप गाडे यांनी चांगल्या कार्यास शुभारंभ म्हणून पथक नेमले व गेल्या कांही दिवसांपासून टुक्कारावर कायदेशीर कारवाई करण्यास सुरू केली . यामध्ये वाहन परवाना पाहणे , विनाकार महविद्याल्याच्या सामोर थांबल्यास कार्यवाही करणे, मुख्य रसयावरील गर्दी कमी करण्यासाठी पथकाच्या वतीने कार्यवाही सुरुवात करण्यात आली व पुढे असेच कारवाई करीत राहिल असे आश्वासन पोलिस निरीक्षक दिलीप गाडे यांनी दिली . या चांगल्या कामगीरीबद्दल विश्व हिंदू परिषद व बजरंग दलच्या वतीने पोलिस निरीक्षक दिलीप गाडे यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला व विश्व हिंदू परिषदेचे नुतन वर्षाचे कॅलेंडर देऊन नवान वर्षाच्या शुभेच्छा देण्यात आल्या .
यावेळी विश्व हिंदु परिषद शहराध्यक्ष महादेव घोणे,बजरंग दल जिल्हा सहसंयोजक रोहित बोईनवाड, शहर सहसंयोजक किशोर कबाडे,सहगौरक्षा प्रमुख प्रशांत कबाडे ,विद्यार्थी प्रमुख प्रेम गगणबोने, सुरक्षा प्रमुख हर्षद साबने, सहसुरक्षा प्रमुख अनिल मदनुरे.साप्ताहिक मिलन प्रमुख,आदित्य देवनाळे व बजरंगी उपस्थित होते.
-

Post a Comment
0 Comments