Type Here to Get Search Results !

उदगीर शहराच्या विविध विकासकामांसाठी ३१ कोटी रुपयाचा निधी मंजूर*

 *उदगीर शहराच्या विविध विकासकामांसाठी ३१ कोटी रुपयाचा निधी मंजूर*



*माजी मंत्री आमदार संजय बनसोडे यांच्या प्रयत्नाला यश*


*उदगीर* : उदगीर शहरातील विविध विकास कामांसाठी निधी उपलब्ध करून द्यावा अशी मागणी माजी मंत्री आमदार संजय बनसोडे यांनी शासनाकडे केली होती. त्यांच्या मागणीचा सकारात्मक विचार करुन महाराष्ट्र शासनाच्या नगर विकास विभागाकडून केंद्र शासनाच्या "भांडवली गुंतवणुकीसाठी राज्यांना विशेष सहाय्य या योजनेंतर्गत उदगीर नगरपरिषद हद्दीत असलेल्या विकास कामांना ३१ कोटी रुपयाच्या विविध विकास कामांना प्रशासकीय मान्यता देण्यात आली असल्याचे माजी मंत्री आ.संजय बनसोडे यांनी सांगितले आहे.


यामध्ये उदगीर शहरातील नागरिकांच्या मागणीनुसार उदगीर शहरातील साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे चौक ते सोमनाथपुर रोड हद्दीपर्यंत सिमेंट रस्ता व नाली करणे, समता नगर सिग्नल नं - २ ते रिंग रोड पर्यंत सिमेंट रस्ता व नाली करणे, जळकोट रोड ते शिवार महादेव मार्गे देगलुर रोड पर्यंतचा (पाणंद रस्ता) सिमेंट रस्ता व नाली करणे, जळकोट रोड वरील मनियार बिल्डिंग ते धन्वंतरी आयुर्वेदिक महाविद्यालय मार्गे देगलूर रोड पर्यंतचा (पाणंद रस्ता) सिमेंट रस्ता व नाली करणे या चार प्रमुख रस्त्यासाठी तब्बल ३१ कोटी १३ लक्ष २३०९९ रुपयाचा निधी आमदार संजय बनसोडे यांच्या अथक प्रयत्नातून मंजूर करुन सदर कामांना प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. आता लवकरच या कामाला प्रत्यक्ष सुरुवात होणार आहे.

 उदगीर शहरातील नागरिकांच्या मागणीनुसार आमदार संजय बनसोडे यांनी कोट्यावधी रुपयाचा निधी मंजूर करून शहरातील अंतर्गत पाणंद रस्त्यांवर दर्जेदार सिमेंट रस्ते व नाली बांधकाम करून त्या- त्या भागातील नागरिकांची होणारी गैरसोय आमदार संजय बनसोडे यांनी दुर केली आहे.

या चारही रस्त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना होणारा त्रास कमी होऊन सदर रस्ते शहराला जोडल्याने दळणवळणाची सोय होणार आहे. काही भागात रस्ते नसल्यामुळे शहराला फेरफटका मारून दोन - तीन किलोमीटरचा लांबचा पल्ला पार करून उदगीर शहरात त्या भागातील नागरिकांना यावे लागत होते मात्र आमदार संजय बनसोडे यांच्या प्रयत्नातून सदर रस्ते हे नव्याने होऊन सर्वसामान्य नागरिक आणि या भागातील विद्यार्थ्यांना उदगीर शहरात ये - जा करण्यासाठी सोईचे होणार असल्याने नागरिकांनी माजी मंत्री आमदार संजय बनसोडे यांचे विशेष आभार व्यक्त केले आहेत.

शहराच्या वैभवात भर टाकण्यासाठी कोट्यावधी रुपयाचा निधी मंजूर केल्याने राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस , उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री अजित पवार, पालकमंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचे माजी मंत्री आमदार संजय बनसोडे यांनी आभार व्यक्त केले आहेत.

Post a Comment

0 Comments