निडेबन जि.प. राखीव मतदारसंघात एकुरकेकरांची पुन्हा एन्ट्री
घड्याळ चिन्हावरच निवडणूक लढविण्याचा निर्धार; २०२६ च्या रणधुमाळीत राष्ट्रवादीकडून माजी क्याबिनेट मंत्री संजय बनसोडे यांच्याकडे तिकीटाची मागणी करुण उमेदवारीची मागितली आहे व जोरदार तयारी सुरु
निडेबन (प्रतिनिधी) –
आगामी जिल्हा परिषद निवडणूक २०२६ च्या पार्श्वभूमीवर निडेबन जिल्हा परिषद राखीव मतदारसंघात राजकीय हालचालींना वेग आला असून, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक तथा माजी समाजकल्याण सभापती श्री. मधुकरराव एकुरकेकर यांनी या मतदारसंघातून निवडणूक लढविण्याचा निर्धार जाहीर केला आहे. त्यांच्या या घोषणेमुळे मतदारसंघातील राजकीय वातावरण तापू लागले आहे.
मधुकरराव एकुरकेकर यापूर्वी याच निडेबन मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या घड्याळ या चिन्हावर निवडून आले होते. त्यांच्या कार्यकाळात सामाजिक न्याय, विकासकामे तसेच सर्वसामान्य नागरिकांच्या प्रश्नांना प्राधान्य देण्यात आले होते. सध्या ते कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक म्हणून प्रभावीपणे कार्यरत असून शेतकरी, कामगार व सामान्य घटकांमध्ये त्यांची चांगली पकड आहे.
मतदारसंघातील नागरिकांशी सातत्याने संपर्क ठेवत विकासाभिमुख भूमिका घेतल्यामुळे एकुरकेकर यांच्या नावाला पुन्हा एकदा मतदारांकडून मोठ्या प्रमाणावर पसंती मिळत असल्याचे चित्र दिसून येत आहे. त्यामुळे आगामी निवडणुकीत त्यांची उमेदवारी ही निर्णायक ठरण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
याबाबत बोलताना मधुकरराव एकुरकेकर म्हणाले
निडेबन मतदारसंघातील जनतेने यापूर्वी माझ्यावर जो विश्वास टाकला, तो विश्वास मी प्रामाणिकपणे जपला आहे. या मतदारसंघातील रस्ते, पाणी, समाजकल्याण, शेतकरी व युवकांचे प्रश्न यासाठी सातत्याने प्रयत्न केले. त्यामुळेच पुन्हा एकदा जनतेच्या सेवेसाठी मी निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला आहे.
ते पुढे म्हणाले की मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे अधिकृतपणे उमेदवारीची मागणी केली असून, पक्षश्रेष्ठी माझ्या नावाचा नक्कीच सकारात्मक विचार करतील, असा मला पूर्ण विश्वास आहे. संधी मिळाल्यास घड्याळ या चिन्हावरच निवडणूक लढवून मतदारसंघातील प्रलंबित प्रश्न सोडवण्यासाठी आणि विकासकामांना अधिक गती देण्यासाठी जोमाने काम करेन.
दरम्यान, निडेबन जिल्हा परिषद मतदारसंघात विविध पक्षांकडून इच्छुक उमेदवारांच्या हालचाली वाढल्या असून, एकुरकेकर यांच्या संभाव्य उमेदवारीमुळे ही निवडणूक अधिकच चुरशीची होणार असल्याचे राजकीय जाणकारांचे मत आहे.

Post a Comment
0 Comments