Type Here to Get Search Results !

निडेबन राखीव मतदारसंघातून बहुजन विकास आघाडीला उमेदवारी द्यावी – संजय कुमार यांची काँग्रेस नेत्यांकडे मागणी

 निडेबन राखीव मतदारसंघातून बहुजन विकास आघाडीला उमेदवारी द्यावी – संजय कुमार  यांची काँग्रेस नेत्यांकडे मागणी



 उदगीर प्रतिनिधी :- आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर बहुजन विकास आघाडीचे अध्यक्ष तथा बहुजन विकास अभियानाचे प्रमुख संजय कुमार मानसिंग पवार यांनी निडेबन येथील राखीव मतदारसंघातून जिल्ह्यातून एकमेव उमेदवारी देण्यात यावी, अशी ठाम मागणी केली आहे.

या मागणीसाठी संजय कुमार पवार व त्यांच्या सहकाऱ्यांनी महाराष्ट्राचे माजी मंत्री दिलीपराव देशमुख, माजी मंत्री अमित भैया देशमुख, खासदार शिवाजी काळगे यांची प्रत्यक्ष भेट घेऊन निवेदन दिले. बहुजन विकास अभियानाच्या माध्यमातून राबविण्यात येणाऱ्या सामाजिक, शैक्षणिक व लोककल्याणकारी उपक्रमांची माहिती देत, या कार्याची दखल घेऊन निवडणुकीत योग्य प्रतिनिधित्व मिळावे, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली.

यावेळी सामाजिक कार्यकर्ते प्रेम तोगरे, हबीब पठाण, मनोज सोनकांबळे, शिवाजी तिवारी, संतोष पाटील, सुनील पाटील, राजकुमार आप्पा कारभारी, नरसिंग गुरमे, राजकुमार गाथाडे यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.

भेटीदरम्यान काँग्रेसच्या सर्व नेत्यांनी बहुजन विकास अभियानाच्या कार्याचे कौतुक करत, “तुम्ही निर्धास्तपणे कामाला लागा. अभियानाचे काम अत्यंत चांगले असून काँग्रेस पक्ष तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे,” असा शब्द दिल्याची माहिती संजय कुमार पवार यांनी दिली.

या आश्वासनामुळे बहुजन विकास आघाडीच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून, येणाऱ्या निवडणुकांत सामाजिक न्याय व विकासाचा मुद्दा केंद्रस्थानी ठेवून जोमाने तयारी करण्याचा निर्धार करण्यात आला आहे.

Post a Comment

0 Comments