आदिशक्ती महिला ग्रुपचा उपक्रम: नवनिर्वाचित महिला नगरसेवकांचा सत्कार
उदगीर : उदगीरकरांनी मोठा विश्वास टाकत आपल्याला नगराध्यक्षपदी काम करण्याची संधी उपलब्ध करून दिली असून, या संधीचे सोने करीत उदगीरच्या सर्वांगीण विकासासाठी आपण कायम प्रयत्नशील राहू अशी ग्वाही देत उदगीरच्या नवनिर्वाचित नगराध्यक्षा सौ. स्वाती सचिन हुडे यांनी पालिकेच्या माध्यमातून महिला सक्षमीकरणासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले.
उदगीर येथील शिवनंदा फँक्शन हॉल येथे आदिशक्ती महिला ग्रुपच्या वतीने नुकत्याच झालेल्या नगर परिषद निवडणुकीत सर्वच पक्षांकडून निवडून आलेल्या महिला नगरसेवकांचा सत्कार करण्यात आला. यावेळी स्वाती हुडे बोलत होत्या. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सौ. शिल्पा संजय बनसोडे होत्या. व्यासपीठावर सौ. प्रेमाताई राजशेखर पाटील प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या.
प्रारंभी या कार्यक्रमामागच्या आयोजनाची भूमिका प्रस्ताविकातून महानंदा सोनटक्के यांनी विषद केली.
यावेळी बोलताना नगराध्यक्षा सौ. स्वाती हुडे म्हणाल्या की, उदगीरच्या मतदारांनी मोठा विश्वास टाकला आहे. या विश्वासास पात्र राहून काम करीत असताना दिलेली आश्वासने पाच वर्षात पूर्ण करण्याचा प्रयत्न करणार आहे. उदगीरच्या सर्वांगीण विकासासाठी काम करीत असताना सर्व महिलांना सोबत घेऊन काम करणार असल्याचे सांगत महिला बचत गटाच्या माध्यमातून महिलांना सक्षम करण्यासाठी प्राधान्याने काम करणार असल्याचे हुडे यावेळी म्हणाल्या.
यावेळी बोलताना सौ. शिल्पा बनसोडे यांनी नवनिर्वाचित नगराध्यक्ष व नगरसेवकांना शुभेच्छा देत पाच वर्षाच्या काळात उदगीरच्या विकासात आपला हातभार लावण्याचे आवाहन केले. आ. संजय बनसोडे राज्य सरकारच्या माध्यमातून नगर परिषदेला मोठा निधी उपलब्ध करून देतील त्या निधीचा योग्य विनियोग करण्यासाठी सर्वानी पुढाकार घ्यावा असे आवाहन केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अनिता हैबतपुरे यांनी केले. आभार प्रा. मंगला विश्वनाथे यांनी मानले.
या कार्यक्रमासाठी योजना चनगे, ज्योत्स्ना समगे, सुनिता मदनुरे, विद्या पांढरे, ज्योती चौधरी, सरस्वती चौधरी, योजना चौधरी, ज्योती डोळे, सीमा तोंडचिरकर, प्रा. शकुंतला पाटील, श्रेया शिरशीकर, रेखा पाटील, उषा कुलकर्णी, प्रा सुनिता चवळे,शमीम शेख, किरण मुंडकर, अर्चना मानकरी, स्मिता पटवारी, आशा पोलावार यांनी पुढाकार घेतला.

Post a Comment
0 Comments