चाकूर अर्बन को-ऑप. क्रेडिट सोसायटी उदगीर शाखेत दिनदर्शिका २०२६ चे प्रकाशन
उदगीर | प्रतिनिधी
चाकूर अर्बन को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लि., लातूर या संस्थेचे अध्यक्ष युनूस मासुलदार यांच्या मार्गदर्शनाखाली आज दि. २६ डिसेंबर २०२५ रोजी उदगीर येथील शाखेमध्ये दरवर्षीप्रमाणे याही वर्षी दिनदर्शिका २०२६ चे प्रकाशन करण्यात आले. गेल्या तीन वर्षांपासून उदगीर शहरात कार्यरत असलेल्या या शाखेने अल्पावधीतच नागरिकांचा विश्वास संपादन केला आहे.
या दिनदर्शिका प्रकाशन सोहळ्यास नूतन नगरसेवक मनोजदादा पुदाले, नूतन नगरसेवक सय्यद जानीभाई, नूतन नगरसेवक हाश्मी इम्रोज, नूतन नगरसेवक ओम गाजुरे यांची प्रमुख उपस्थिती होती. तसेच ज्येष्ठ पत्रकार सावळे श्रीधर, संस्थेचे संचालक मंडळ सदस्य कलीम शेख व महताब शेख, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या तालुकाध्यक्षा उर्मिला वाघमारे हेही यावेळी उपस्थित होते.
यावेळी संस्थेचे अनेक खातेदार व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यामध्ये गिरी गणेश, शेख लुखमान, बागवान युसुफ, शेख अथर, सोहेल जरगर, शेख ऐजास, शेख अमीर, शेख नवीद, शेख मुखीद, शेख खयुम, मोसीन बागवान, शेख रशिद, शेख सलिम, शेख जावेद, खान आवेज, पटेल खाजा, तांबोळी इफ्रान, कप्पीकरे नरेश, माधव पाटील आदींचा समावेश होता. याशिवाय चाकूर अर्बन संस्थेचे सर्व कर्मचारी वर्ग कार्यक्रमास उपस्थित होते.
कार्यक्रमप्रसंगी मान्यवरांनी चाकूर अर्बन को-ऑप. क्रेडिट सोसायटीच्या कार्याचा गौरव करत संस्थेने ग्राहकाभिमुख सेवा, पारदर्शक आर्थिक व्यवहार व विश्वासार्हतेच्या बळावर उदगीर शहरात वेगळी ओळख निर्माण केल्याचे सांगितले. अध्यक्ष युनूस मासुलदार यांच्या नेतृत्वाखाली संस्थेची प्रगती सातत्याने होत असून भविष्यातही सर्वसामान्य नागरिकांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी संस्था कार्यरत राहील, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.
दिनदर्शिका २०२६ ही माहितीपूर्ण, सामाजिक संदेश देणारी व संस्थेच्या उपक्रमांचा आढावा घेणारी असल्याने ती नागरिकांसाठी उपयुक्त ठरेल, असे मत उपस्थितांनी व्यक्त केले. कार्यक्रम शांततामय व उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.

Post a Comment
0 Comments