Type Here to Get Search Results !

आ. संजय बनसोडे यांचा नियोजनबद्ध प्रचार फळाला आला !! भारतीय जनता पक्षाच्या सौ. स्वाती सचिन हुडे नगराध्यक्ष झाल्या !!

 आ. संजय बनसोडे यांचा नियोजनबद्ध प्रचार फळाला आला !! 

 भारतीय जनता पक्षाच्या सौ. स्वाती सचिन हुडे नगराध्यक्ष झाल्या !!



उदगीर (एल पी उगिले) उदगीर नगर परिषदेच्या अत्यंत प्रतिष्ठेच्या ठरलेल्या निवडणुका शेवटी माजी मंत्री तथा विद्यमान आमदार संजय बनसोडे यांच्या सुनियोजनबद्ध प्रचार यंत्रणा आणि कार्यकर्त्यांचा एकोपा टिकउन ठेवण्यात मिळवलेले यश, यामुळे एक हाती सत्ता मिळवण्यात भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या युतीला मोठे यश आले आहे. युतीच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार स्वाती सचिन हुडे यांनी 29 हजार 701 मते घेऊन मोठा विजय संपादन केला आहे. काँग्रेस पक्षाच्या उमेदवार डॉ. अंजुम अब्दुल्ला कादरी यांना 19558 तर एम आय एम च्या सय्यद गुल्फराज ताहेर हुसेन यांना 4306 तर शिंदे गटाच्या शिवसेनेला केवळ 1760 वर समाधान मानावे लागले. 


 विजयी उमेदवारांचा तपशील असा:- प्रभाग एक अ बनसोडे मंजुश्री शशिकांत राष्ट्रवादी काँग्रेस यांनी 1592 मते मिळवून काँग्रेसच्या कांबळे अनुसया रामचंद्र (979) यांचा पराभव करत विजय संपादन केला. 

प्रभाग क्रमांक एक ब मध्ये कसबे धीरज पांडुरंग या राष्ट्रवादीच्या उमेदवाराने 1845 मते मिळवत मोठ्या फरकाने काँग्रेसचे पठाण सिमरन खान (938) यांचा पराभव केला. 

प्रभाग क्रमांक दोन अ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे शेख सना कौसर यांनी 1274 मते मिळवत एमआयएमच्या राजा पटेल हजरा साबेर(1140) यांच्यावर विजय संपादन केला. 

प्रभाग दोन ब मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे सय्यद इम्रान पाशा यांनी 1174 मते मिळवत काँग्रेसचे शेख मोहम्मद इम्तियाज (978) यांच्यावर विजय मिळवला. 

प्रभाग क्रमांक तीन अ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे बोईनवाड व्यंकटराव भीमराव यांनी 1638 मते मिळवत काँग्रेसचे कबाडे राजेंद्र गणपत (1575) यांचा पराभव केला. तर प्रभाग तीन ब मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या कपाळे गंगाबाई गुरुनाथ यांनी 1960 मते घेत काँग्रेसच्या सय्यद शहाणाज अतिख (1154) यांचा पराभव केला. 

प्रभाग चार अ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे भालेराव राजकुमार श्रीपती यांनी 1775 मते मिळवत काँग्रेसचे सोनकांबळे मानव रवी कुमार (384) यांचा दारुण पराभव केला. प्रभाग चार ब मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या मुदाळे मनकर्णा अनिल यांनी 1669 मते घेऊन काँग्रेसच्या आडे ऋतुजा (539) यांचा पराभव केला. प्रभाग पाच अ मध्ये राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे पठाण मंजूरखा मोहम्मद खान यांनी 1620 मते घेऊन राष्ट्रवादी काँग्रेसचे शेख फैयाजोदिन नसिरुद्दीन (1111) यांचा पराभव केला. 

प्रभाग पाच ब मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या ऊपरबावडे शिल्पा मल्लिकार्जुन यांनी 12 57 मते घेऊन काँग्रेसच्या उपरबावडे स्वाती (1234) त्यांचा पराभव केला. प्रभाग 6 अ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या कुरेशी आलिया फिरदोस यांनी 1648 मते घेत एम आय एम च्या कुरेशी सय्यद फकीर (1544) यांचा पराभव करून विजय संपादन केला. प्रभाग 6 ब मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या सय्यद रेश्मा यांनी1657 मते घेऊन एम आय एम च्या हाश्मी सय्यद शहनाज (1269) यांचा मोठा पराभव केला. 

प्रभाग सात अ मध्ये भाजपाचे पुदाले मनोज रामदासराव यांनी 1988 मते घेऊन काँग्रेसचे बागवान अयाज इस्माईल साब (1009) त्यांचा पराभव केला. 

प्रभाग सात ब मध्ये काँग्रेस पक्षाच्या गांजुरे संध्या ओमकार यांनी 1462 मते घेऊन भाजपच्या बागबंदे छाया बसवराज (1062) यांचा पराभव केला. 

प्रभाग आठ अ मध्ये भाजपच्या अंबरखाने निकिता वीरकुमार यांनी 1553 मते घेऊन शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या पडले मीरा तुकाराम (644) यांचा पराभव केला. 

प्रभाग आठ ब मध्ये भारतीय जनता पक्षाचे राजकुमार हुडगे यांनी 1434 मते घेऊन काँग्रेस पक्षाचे शेटकार सोमनाथ (894) यांचा पराभव करून मोठा विजय संपादन केला. 

प्रभाग क्रमांक नऊ अ मध्ये भारतीय जनता पक्षाचे कांबळे जवाहर बन्सीलाल यांनी 11 94 मते घेऊन काँग्रेस पक्षाचे पिंपरे आदर्श गौतम (894) यांच्यावर विजय संपादन केला. 

प्रभाग क्रमांक 9 ब राष्ट्रवादी काँग्रेसच्या कांबळे वर्षा पंकज यांनी 1804 मते घेऊन काँग्रेस पक्षाच्या बागवान जरीना बेगम (830) यांचा दारुण पराभव केला. प्रभाग क्रमांक 10 अ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे सांगवे निवृत्ती संभाजी यांनी 1454 मते घेऊन एम आय एम चे जोंधळे प्रदीप दौलतराव (1197) यांचा पराभव करून विजयी झाले. 

प्रभाग 10 ब मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या शेख नूरजन्हा इस्माईल यांनी 1447 मते घेत एम आय एम च्या पठाण हलीमा रहिमदिन (1098) यांचा पराभव करून विजय संपादन केला. 

प्रभाग 11 अ मध्ये एमआयएमच्या शेख हिना मुक्रम जागीरदार यांनी 1631 मते घेत राष्ट्रवादी काँग्रेसच्या शेख शहाजहा बेगम (869) यांचा दणदणीत पराभव केला. प्रभाग 11 ब मध्ये एमआयएमचे सय्यद ताहेर हुसेन यांनी 1319 मते घेत राष्ट्रवादी काँग्रेसचे पठाण फैज मोहम्मद (1100) यांच्यावर दणदणीत विजय मिळवला. 

प्रभाग क्रमांक 12 अ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे सूर्यवंशी अमरनाथ हरीकिशन यांनी 2244 मध्ये घेऊन काँग्रेसचे गायकवाड राहुल सुधाकर (431) यांच्यावर दणदणीत विजय मिळवला. 

प्रभाग 12 ब मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या सय्यद खुर्शिदबी हनीफ साब यांनी 2243 मते घेऊन काँग्रेसचे शेख सुलतान बेगम (429) यांचा दणदणीत पराभव केला. 

प्रभाग 13 अ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या शिंदे शीतल नरसिंग यांनी 2297 मते मिळवत काँग्रेसच्या सावंत प्रतीक्षा कोंडीबा (171) यांचा दारुण पराभव केला. 

प्रभाग 13 ब मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे मुदाळे अनिल नागोराव यांनी 2079 मते मिळवून काँग्रेसचे शेख हरून (241) यांचा दारुण पराभव केला.

प्रभाग 14 अ मध्ये भारतीय जनता पक्षाच्या बुंदे विद्या अनंत यांनी 1061 मते मिळवत काँग्रेस पक्षाच्या पटवारी जयश्री महेश (975) यांचा पराभव केला. 

प्रभाग 14 ब मध्ये काँग्रेस पक्षाच्या चाऊस उमर सालेह बिन यांनी 865 मते मिळवत भारतीय जनता पक्षाचे चिमेगाव साईनाथ माधवराव (632) यांचा पराभव केला.

प्रभाग 15 अ मध्ये भारतीय जनता पक्षाचे अष्टुरे नागेश रमेश यांनी 1463 मते मिळवत अपक्ष उमेदवार चिमेगावे अरुणा साईनाथ (517) यांचा पराभव केला. 

15 ब मध्ये भारतीय जनता पक्षाच्या भोसले भारती सुधीर यांनी 1873 मते घेत काँग्रेस पक्षाच्या कादरी साहेरा (295) यांचा दारुण पराभव केला. 

प्रभाग 16 अ मध्ये काँग्रेस पक्षाच्या मिर्झा रेश्मा जबीन यांनी 1137 मते मिळवत भारतीय जनता पक्षाच्या येलमटे मीरा बापूराव(1076) यांचा पराभव केला.

प्रभाग 16 ब मध्ये काँग्रेस पक्षाचे चंदन बसवराज पाटील नागराळकर यांनी 1154 मते मिळवत भारतीय जनता पक्षाचे पाटील दत्ताजी व्यंकटराव (883) यांचा पराभव केला.

प्रभाग 17 अ मध्ये भाजपचे महापुरे शांताबाई यांनी 1706 मते मिळवत काँग्रेसच्या वाघमारे साक्षी गणेश (563) यांचा दारुण पराभव केला.

प्रभाग 17 ब मध्ये भाजपचे विजय राजेश्वर निटूरे यांनी 1903 मते मिळवत काँग्रेस पक्षाचे पाटील श्रीकांत कल्याणराव (476) यांचा दणदणीत पराभव केला. 

प्रभाग 18 अ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे शेख समीरोद्दीन अजीमुद्दीन यांनी 1208 मते घेऊन शिंदे सेनेचे राठोड संजय जेमला (916) यांचा पराभव केला. 

प्रभाग 18 ब मध्ये भारतीय जनता पक्षाचे कोठारे मीना चंद्रकांत यांनी 1228 मते मिळवत काँग्रेस पक्षाचे पाटील संगीता नरेंद्र (942) यांचा पराभव केला. 

प्रभाग 19 अ मध्ये भारतीय जनता पक्षाच्या पस्तापुरे अंजली सावन यांनी 1584 मते मिळवत काँग्रेस पक्षाच्या पूरी शिल्पा प्रवीण (734) यांचा पराभव केला. 

प्रभाग 19 ब मध्ये भारतीय जनता पक्षाचे पाटील शहाजी भगवान यांनी 1276 मते मिळवत काँग्रेस पक्षाचे पाटील विराज विजयकुमार (1006) यांच्यावर दणदणीत विजय मिळवला. प्रभाग वीस अ मध्ये भारतीय जनता पक्षाच्या गायकवाड गोकर्णा गणेश यांनी 1182 मते मिळवत अपक्ष उमेदवार गायकवाड पुष्पा नवनाथ (584) यांचा पराभव केला. 

प्रभाग 20 ब मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पाटोदे बाळू शंकरराव यांनी 1489 मते मिळवत काँग्रेस पक्षाचे भोसले राजेंद्रकुमार विठ्ठलराव (575) यांचा पराभव केला. 


चौकट......

माजी आमदार सुधाकर भालेराव यांचे हवेत गोळीबार तीन ठार !.....


उदगीर नगरपालिकेच्या निवडणुकीच्या निमित्ताने माजी आमदार सुधाकर भालेराव यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार पक्षातून शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला. आणि प्रवेशाच्या नंतर मोठा धूम धडाका गाजवत उदगीर नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये स्वतंत्र अस्तित्व दाखवण्याच्या उद्देशाने पॅनल उभे केले मात्र दुर्दैवाने त्यांना खातेही उघडता आले नाही. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उदगीर येथे सभा घेऊन देखील एकही जागा निवडून आली नाही. किंवा त्यांचा परिणाम झाल्यामुळे भारतीय जनता पक्षाला किंवा अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला धक्काही लागला नाही असे म्हटले तर वावगे होणार नाही. 

सुरुवातीला अशी चर्चा होती की शिवसेनेच्या उमेदवाराच्या प्रचारामुळे भारतीय जनता पक्ष अडचणीत येईल मात्र तसे काहीही झाले नाही 1760 च्या पुढे शिंदे सेनेच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवाराला जाता आले नाही तर भारतीय जनता पक्षाच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार स्वाती सचिन हुडे यांनी दहा हजाराहून अधिक मताधिक्य घेऊन दणदणीत विजय संपादन केला आहे. त्यामुळे माजी आमदार सुधाकर भालेराव यांची स्थिती हवेत गोळीबार तीन ठार म्हणावे, अशीच आहे. 


चौकट......

पूर्वीच्या निवडणुकामध्ये दोन्ही राष्ट्रवादी एक असताना उदगीर नगर परिषदेच्या सभागृहात राष्ट्रवादी काँग्रेसचा एकही नगरसेवक नव्हता. मात्र अत्यंत उत्कृष्ट नियोजन आणि प्रचार यंत्रणा राबवत विद्यमान आमदार संजय बनसोडे यांनी आज घडीला सभागृहातील सर्वात मोठा पक्ष म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष निर्माण केला आहे. तब्बल वीस नगरसेवक राष्ट्रवादी काँग्रेसचे निवडून आणले आहेत. त्यांच्या एकूण मेहनतीची ही पावतीच म्हणावी लागेल. भाजपमधील काही अति महत्वकांक्षी आणि फाजील आत्मविश्वास बाळगणाऱ्या उमेदवारांना मात्र मतदारांनी झिडकारले आहे. भारतीय जनता पक्षासोबत राष्ट्रवादी काँग्रेसची युती झाल्यामुळे भारतीय जनता पक्षाचे 13 नगरसेवक सभागृहात असणार आहेत. सभागृहामध्ये काँग्रेसचे पाच तर एम आय एम चे फक्त दोन नगरसेवक दिसतील. 


चौकट.......


एम आय एम ची अधोगती...


मागील निवडणुकीच्या दरम्यान एमआयएमचे सहा नगरसेवक सभागृहात होते. मात्र यावेळेस एमआयएमचे केवळ दोन नगरसेवक निवडून आल्याने उदगीर मधून एम आय एम हद्दपार होण्याच्या मार्गावर आहे की काय? अशी चर्चा आता जोर धरू लागली आहे. एमआयएमची ही अधोगती कशामुळे झाली? या अधोगतीला कोण कारणीभूत ठरले? त्याचे आत्मपरीक्षण एमआयएमचे नेते करतील अशी शक्यता आहे. 


चौकट...


काँग्रेसला "अकेला चलो रे" ची भूमिका महागात पडली!


महाविकास आघाडीच्या ऐवजी काँग्रेस पक्षाने स्वबळाचा नारा देऊन राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला बाजूला ढकलल्याने तसेच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या केवळ एका उमेदवाराला सोबत घेतल्याने इतर नाराज झालेले इच्छुक वेगवेगळ्या पक्षात गेल्याने काँग्रेसची ताकद कमी झाली. काँग्रेसच्या बरोबरीने राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या कार्यकर्त्यांना सोबत घेऊन निवडणुका लढवल्या असत्या तर निश्चितच यापेक्षा चांगला निकाल काँग्रेसकडे राहिला असता.

Post a Comment

0 Comments