उदयगिरीत डॉ. बाबा आढाव व ज्येष्ठ नेते शिवराज पाटील यांना श्रद्धांजली
उदगीर.... ज्येष्ठ समाजवादी नेते आणि कष्टकऱ्यांचे लढवय्ये डॉ. बाबा (बाबासाहेब पांडुरंग) आढाव तसेच ज्येष्ठ लोकप्रतिनिधी शिवराज पाटील यांच्या निधनानंतर महाविद्यालयात श्रद्धांजली सभा घेण्यात आली. यावेळी अध्यक्ष बस्वराज पाटील नागराळकर यांनी दोन्ही विभूतींच्या बाबत सांगितले की, दोघेही लेखक होते आणि आपल्याला क्षेत्रात संत होते. तसेच सचिव डॉ. रामप्रसाद लखोटिया, सहसचिव प्रशांत पेन्सलवार, प्राचार्य डॉ. आर. के. मस्के, प्रा. प्रवीण जाहुरे, प्रा. नागनाथ खांडेकर, प्रा. डॉ. दीपक चिद्दरवार, अॅड. औरादे यांनी श्रध्दांजलीपर सभेत सांगितले की, डॉ. बाबा आढाव यांनी आयुष्यभर असंघटित कामगार, हमाल, रिक्षाचालक आणि वंचित घटकांच्या हक्कांसाठी संघटन, चळवळी आणि कायदेशीर लढ्यांद्वारे काम केले होते. शाहू–फुले–आंबेडकरांच्या विचारांचा वारसा पुढे नेणारे आणि ‘एक गाव–एक पाणवठा’ सारख्या उपक्रमातून सामाजिक समता उभी करणारे डॉ. आढाव यांच्या निधनाने सामाजिक चळवळीचा आधारस्तंभ हरपल्याची भावना वक्त्यांनी व्यक्त केली. या सभेत ज्येष्ठ नेते शिवराज पाटील यांच्या सार्वजनिक जीवनातील योगदानाचाही उल्लेख करण्यात आला, त्यांनी समाजसेवा म्हणून राजकारण केले, विविध पदांवर नगराध्यक्ष ते राज्यपाल काम करताना लोकशाही मूल्ये, प्रामाणिकता आणि सुशासन यांना नेहमी प्राधान्य दिल्याचे यावेळी बोलताना मान्यवरांनी सांगितले. सभेच्या सुरुवातीला दोन्ही विभूतींच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून उपस्थितांनी दोन मिनिटे मौन पाळत श्रद्धांजली व्यक्त केली. यावेळी उपाध्यक्ष बसवराज पाटील मलकापूरकर, कोषाध्यक्ष महादेव नौबदे, सदस्य शिवराज वल्लापुरे, नाथराव बंडे , उपप्राचार्य डॉ. एस. एन. हल्लाळे आणि प्रा. एस. जी. कोडचे उपस्थित होते.

Post a Comment
0 Comments