मानाच्या आजोबा गणपतीची माजी मंत्री आ.संजय बनसोडे यांच्या हस्ते आरती
उदगीरच्या गणेश मंडळांनी समाजाभिमुख उपक्रम राबवून सर्वांचे लक्ष वेधले : माजी मंत्री आ.संजय बनसोडे
उदगीर, गेल्या ७ दिवसात उदगीर मतदार संघात अतिशय उत्साहाचे वातावरण होते. शहरातील विविध गणेश मंडळांनी समाजाभिमुख देखावे सादर करुन भक्तांची मने जिंकली. गणेश मंडळांनी विविध देखाव्यातुन आपल्या संस्कृतीचे दर्शन उदगीरकरांना दाखवून दिले. आपल्या उदगीरचा नवसाला पावणारा गणपती म्हणून पारकट्टी गल्लीचा आजोबा गणपती पंचक्रोशित प्रसिद्ध आहे. गेल्या ७ दिवसात मी विविध गणेश मंडळाला भेटी दिल्या अतिशय उत्साहाचे वातावरण होते. यामध्ये रक्तदान शिबीर, अन्नदान यासह विविध देखावे सादर केले आहेत. गणेश मंडळाच्या समाजाभिमुख उपक्रमांनी सर्वांचे लक्ष वेधले असल्याचे मत आ.संजय बनसोडे यांनी व्यक्त केले.
यावेळी आ.संजय बनसोडे यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते मानाच्या आजोबा गणपतीची आरती करुन विसर्जन मिरवणुकीला सुरुवात करण्यात आली.
यावेळी लातूरच्या जिल्हाधिकारी वर्षा ठाकुर धुगे, लातूर जिल्हा पोलीस अधिक्षक अमोल तांबे, माजी नगराध्यक्ष राजेश्वर निटुरे, माजी जि.प. अध्यक्ष राहुल केंद्रे, अप्पर पोलीस अधिक्षक मंगेश चव्हाण, उपविभागीय पोलीस अधिकारी गजानन भातलवंडे, उपजिल्हाधिकारी सुशांत शिंदे, तहसीलदार राम बोरगावकर, पो.नि.राजकुमार पुजारी, पो.नि.दिलीप गाडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष बालाजी भोसले,शहराध्यक्ष सय्यद जानीमियाँ, भाजपा शहराध्यक्ष अमोल अनकल्ले, कार्याध्यक्ष शशिकांत बनसोडे, उत्तरा कलबुर्गे, अॅड.वर्षा कांबळे, वैशाली कांबळे, प्रा.मल्लेश झुंगास्वामी, संग्राम हुडगे,राजकुमार हुडगे, सूर्यकांत कुरुपखेळगे, गुरुनाथ धनशेट्टे, बाळासाहेब मरलापल्ले,प्रशांत मांगुळकर, राहुल अंबेसंगे, सनाउल्ला खान,आदी उपस्थित होते.
पुढे बोलताना आ.संजय बनसोडे यांनी, सन
१९५० ला आजोबा गणपतीची स्थापणा करण्यात आली असुन गेल्या ७५ वर्षात या मानाच्या गणपतीने अनेक समाजाभिमुख उपक्रम राबवले आहेत. यावर्षी शासनाने डाॅल्बीमुक्त गणेशोत्सव करुन समाजात एक नविन आदर्श निर्माण केला असल्याचे सांगुन पारकट्टी गल्ली येथील चौकी मठाला निधी देणार असल्याचे आ.बनसोडे यांनी जाहिर केले. आपला गणेशोत्सव हा शांततेत साजरा करण्याचे आवाहनही त्यांनी यावेळी गणेश भक्तांना केले.

Post a Comment
0 Comments