उदगीर येथे शुक्रवारी ईद मिलाद निमित्त जाहीर सभेचे आयोजन
उदगीर/प्रतिनिधी: ईद मिलाद निमित्त दि. ५ सप्टेंबर २०२५ रोजी सायंकाळी ७ वाजता नगर परिषद समोर उदगीर येथे पैगंबर संदेश ''द्वेषाच्या काळात दयेचा संदेश'' या विषयावर डॉ. रफीक पारनेकर, प्रा डॉ. विजयकुमार गोविंदराव पाटील एकंबेकर हे मार्गदर्शन करणार आहेत.
या जाहीर सभेला नागरिकांनी उपस्थित राहावे असे आवाहन जन परिवर्तन सिरत कमिटीचे अध्यक्ष अझरोद्दीन शमशोद्दीन शेख, फारूकी रियाजोद्दीन, हाश्मी शोएब यांच्या वतीने करण्यात आले आहे.
यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी हजरत मौलाना अजीमोदीन मणियार हे राहणार आहेत. तर प्रमुख उपस्थितीत लातूर चे खासदार डॉ. शिवाजीराव काळगे, माजी मंत्री आमदार संजय बनसोडे, पोलीस अधीक्षक अमोल तांबे, हजरत मौलाना अजीजुरहेमान, व हजरत मौलाना मुफ्ती हम्माद कुरेशी कासमी, उदगीर चे उपजिल्हाधिकारी सुशांत शिंदे, तहसीलदार राम बोरगावकर, उपविभागीय पोलिस अधिकारी गजानन भातलवंडे, पोलीस निरीक्षक दिलीप गाडे, पोलीस निरीक्षक राजकुमार पुजारी, मुख्याधिकारी सोमनाथ जाधव, सय्यद युनुस हाश्मी आदी उपस्थित राहणार आहेत.

Post a Comment
0 Comments