Type Here to Get Search Results !

ना पंचनामा, ना घोषणा आणि आश्वासनांचे, पाहणीचे नाटक !! स्वप्निल अण्णा जाधव यांच्याकडून पूरग्रस्तांना अन्नधान्याचे किट वाटप !!

 ना पंचनामा, ना घोषणा आणि आश्वासनांचे, पाहणीचे नाटक !!

स्वप्निल अण्णा जाधव यांच्याकडून पूरग्रस्तांना अन्नधान्याचे किट वाटप !!



उदगीर (प्रतिनिधी ) उदगीर विधानसभा मतदारसंघातील युवा नेते स्वप्निल अण्णा जाधव यांनी आपल्या युवा मित्र मंडळाच्या वतीने बोरगाव धडकनाळ येथे अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करून, नुकसानग्रस्तांना फुल ना फुलाची पाकळी म्हणून गौरी गणपती सणाच्या पूर्वसंध्येला अन्नधान्याचे कीट वाटप करून गोरगरिबांच्या आणि शेतकऱ्यांच्या घरचा सण साजरा करण्याचे पुण्य उचलले आहे. असे म्हटले तर वावगे होणार नाही. 


स्वप्निल अण्णा जाधव हे तसे पाहिले तर एका कामगाराचा, कष्टकऱ्याचा मुलगा, मात्र त्यांच्या वडिलांनी सामाजिक जाणीवा जपण्याची भूमिका त्यांना समजावून सांगून, आणि अडचणीत सापडलेल्या गोरगरिबांना मदतीचा हात द्यावा. अशी शिकवण दिलेली असल्यामुळे, आपल्याकडे असलेल्या एका भाकरीतली अर्धी भाकरी गरजूला द्यावी. या भूमिकेतून स्वप्नील अण्णा जाधव यांनी या गावातील पीडित लोकांना अन्नधान्याचे किट वाटप केले. कोणताही राजकीय स्वार्थ किंवा उद्देश डोळ्यासमोर न ठेवता केवळ लोककल्याणाची भावना आणि समाज हित जपावे, असे वाटल्यामुळे आपण आपल्या परीने जेवढे शक्य आहे, ती मदत सणाच्या पूर्वसंध्येला करत असल्याचे मत स्वप्नील अण्णा जाधव यांनी व्यक्त केले आहे. 


वर्षभर शेतात राब राब राबून रास करायला आलेले पीक या अतिवृष्टीने वाहून गेले. इतकेच नाही तर कित्येक शेतकऱ्याची शेती वाहून गेली, अक्षरश: शेतातील माती खरडून गेली, शेतकऱ्यांचे हे नुकसान कधीही भरून येणार नाही, इतके मोठे आहे. त्या शेतकऱ्यांना आश्वासनांची खैरात किंवा मोठमोठे वायदे करत बसण्यापेक्षा सरळ मदत करावी. या भावनेतून स्वप्नील अण्णा जाधव मित्र मंडळाच्या वतीने या अतिवृष्टी ग्रस्त गावातील 110 कुटुंबीयांना अन्नधान्याची किट वाटप केले. 


स्वप्निल अण्णा जाधव यांचे वडील कै. अनिल गोविंदराव जाधव यांनी मोठ्या कष्टाने शून्यातून विश्व उभा केले. त्यांनी उभारलेल्या व्यवसायाला विकसित करत वटवृक्षांमध्ये रूपांतर करण्याचे काम स्वप्निल अण्णा जाधव करत आहेत. मात्र हे करत असताना त्यांनी काय सामाजिक जाणीव जपली आहे. ते जपत आहेत, ही त्यांच्या कामातील विशेष बाब म्हणून आज लोक त्यांच्याकडे पाहत आहेत. जणू आपल्या वडिलांची लोककल्याणाची भावना त्यांच्या अंतःकरणांमध्ये रुजलेली आहे. आपल्या भागातील गोरगरिबांना मदत केली पाहिजे.                  आपण शून्यात होतो, त्यावेळेस आपल्याला कोणी मदत केली नाही. ही जाणीव कायम स्वप्नील अण्णा जाधव यांच्या वडिलांना होती. त्यामुळे च त्यांनी आपल्या मुलाला सामाजिक जाणीव जपण्याचा सल्ला दिला. त्यासोबतच श्रीमंती आली म्हणून माजू नको, गरिबी आली तर लाजू नको. असा सल्ला देऊन जनतेच्या अडीअडचणीला धावून जाण्याचे बाळकडू त्यांना पाजले आहे की काय? असे म्हटले तर वावगे होणार नाही. कारण आज आपल्या वडिलांचे स्मरण आणि शिकवण डोळ्यासमोर ठेवून समाजहित जपण्याचे जे काम त्यांनी सुरू केले आहे, ते निश्चितच वाखाण्याजोगे आहे. 


समाज कार्य करत असताना त्याला राजकारणाची किनार लागल्यास आपल्याला मोठ्या गतीने काम करता येईल, असा विचार करून त्यांनी राजकारणात पदार्पण करण्याच्या उद्देशाने अगदी तरुण वयातच उदगीर विधानसभा मतदारसंघातून विधानसभेची निवडणूक लढवली. निवडणुकीमध्ये साम, दाम, दंड, भेद या निती वापरल्या जातात. हे त्यांनी प्रत्यक्ष पाहिले, पहिल्याच झटक्यात आपल्याला विजय मिळेल, असा उद्देश त्यांचा नव्हता. आपण लोकापर्यंत पोहोचले पाहिजे, लोकांच्या अडीअडचणी जाणून घेतल्या पाहिजेत, त्या सोडवण्याची कुवत आपल्या अंगामध्ये निर्माण झाली पाहिजे. ही जाणीव ठेवून समाजकार्याचा भाग म्हणून स्वखर्चाने समाजाच्या कार्यात सिंहाचा वाटा उचलायला त्यांनी सुरुवात केली आहे. 


आपल्या वडिलांनी समाजसेवा कर असा दिलेला सल्ला ते प्रत्यक्ष राबवत आहेत. ते तसे फार श्रीमंत नाहीत, परंतु त्यांच्या मनाची श्रीमंती लाख मोलाची आहे. मी मी म्हणणाऱ्या श्रीमंतांनाही लाजवेल इतकी मोठी श्रीमंती त्यांची आहे. स्वतःच्या कष्टाने कमावलेला पैसा गोरगरिबांना, आणि कष्टकऱ्यांना मदत म्हणून वाटप करण्याची एक दानत लागते. ती दानत स्वप्निल अण्णा जाधव यांच्यामध्ये दिसून येते. 


निसर्गाने अचानक घालाघातल्यामुळे शेतकरी, कष्टकरी यांच्यासमोर फार मोठे दुःख आले आहे. ते निस्तारण्या साठी जे लागेल ते करण्याची तयारी ठेवत, सणासुदीच्या निमित्ताने स्वप्निल अण्णा जाधव मित्र मंडळाच्या वतीने अतिवृष्टीच्या कारणाने ज्यांचे नुकसान झाले, त्यांना मदतीचा हात म्हणून अन्नधान्याचे किट वाटप केले आहे. 


आपल्या भागातील कष्टकऱ्यांचे हित जपले पाहिजे, त्यांना मदतीचा हात दिला पाहिजे, या भावनेने स्वप्निल अण्णा जाधव प्रत्यक्ष कार्य करत आहेत. त्यांनी अनेक वेळा कष्टकऱ्यांचा सन्मान करण्यासाठी मोठमोठे कार्यक्रम ठेवून कामगारांना सहकार्य करत आहेत. आज एवढ्या तरुण वयात प्रत्येक गावात आणि गावातल्या प्रत्येक व्यक्तीपर्यंत त्यांचे नाव पोहोचले आहे. 


या गोष्टीची जाणीव ठेवूनच त्यांनी अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना फुल ना फुलाची पाकळी म्हणून अन्नधान्याची कीट वाटप केले केले असल्याचे सांगितले आहे.


त्यांचे हे कार्य निश्चितच नव्या पिढीतील तरुणांसाठी प्रेरणादायी ठरणार आहे. असे म्हटले तर वावगे होऊ नये.

Post a Comment

0 Comments