चाकूर तालुक्यातील शेळगाव जवळील तिरु नदीकाठी एका सुटकेसमध्ये आढळला महिलेचा मृतदेह; परिसरात खळबळ
चाकूर तालुक्यातील शेळगाव येथील तिरु नदीच्या पुलाजवळ झुडपात ठेवलेल्या एका सुटकेसमध्ये अज्ञात महिलेचा मृतदेह आढळल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. या घटनेमुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
२४ ऑगस्ट २०२५ रोजी सायंकाळी ४ ते ५ वाजण्याच्या सुमारास परिसरात दुर्गंधी येत असल्याचे शेतकऱ्यांच्या लक्षात आले. त्यांनी पोलिसांना याची माहिती दिली. माहिती मिळताच वाढवणा पोलीस स्टेशन चे सहायक पोलीस निरीक्षक सुनील गायकवाड तसेच चाकूर पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक बालाजी भंडे तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. तपासासाठी जिल्ह्याचे अतिरिक्त पोलीस अधिक्षक मंगेश चव्हाण स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक बावकर पथकासह घटनास्थळी पोहचले
तपासणी केली असता, झाडीत एक सुटकेस आढळून आली. ती उघडल्यावर आतमध्ये कपडे घातलेल्या अवस्थेत एका महिलेचा मृतदेह असल्याचे समोर आले. हा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत असल्यामुळे ओळख पटवणे कठीण झाले आहे. पोलिसांनी पंचनामा करून मृत्यदेह ताब्यात घेऊन स्वइच्छेदनासाठी प्राथमिक आरोग्य केंद्र चपोली येथे हलविण्यात आले
या घटनेनंतर स्थानिक गावकऱ्यांनी पोलिसांच्या निष्क्रियतेवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. त्यांच्या मते, शेळगाव हे दोन पोलीस ठाण्यांच्या सीमेवर
असल्यामुळे या भागात पोलिसांची गस्त (पेट्रोलिंग) नसते. यामुळे गुन्हेगारांना मोकळे रान मिळते आणि अशा घटना घडतात, असे नागरिकांचे म्हणणे आहे. परिसरात भीतीचे वातावरण
या प्रकारामुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजी आणि असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे. यापूर्वीही चाकूर-वाढवणा रोडवर अशाच प्रकारची एक घटना घडल्याने लोकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. पोलिसांच्या निष्क्रियतेमुळे गुन्हेगारी वाढत असल्याचा आरोप स्थानिक नागरिक करत आहेत. पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

Post a Comment
0 Comments