Type Here to Get Search Results !

अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना तात्काळ मदत द्यावी महाराष्ट्र जनएकता संघटनेचे तहसीलदारांना निवेदन



अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना तात्काळ मदत द्यावी

महाराष्ट्र जनएकता संघटनेचे तहसीलदारांना निवेदन



उदगीर (प्रतिनिधी) :
उदगीर तालुक्यातील बोरगाव व धडकनाळ परिसरात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. पिके उध्वस्त होऊन शेतकरी हतबल झाले असून पावसामुळे अनेक जनावरे मृत्युमुखी पडली आहेत. या आपत्तीग्रस्त शेतकऱ्यांना तात्काळ शासनाने मदत द्यावी, या मागणीसाठी महाराष्ट्र जनएकता संघटनेच्या वतीने तहसीलदारांना निवेदन देण्यात आले.

यावेळी महाराष्ट्र जनएकता संघटनेचे जिल्हा कार्याध्यक्ष ईस्माईल मनियार, तालुका अध्यक्ष सिकंदर शेख, शहर अध्यक्ष नोमान सय्यद, तालुका उपाध्यक्ष अभिजीत थोरे, उत्तम बिरादार, बालाजी भोसले, अबरार पटेल, खदीर शेख यांच्यासह संघटनेचे कार्यकर्ते व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी तातडीने पंचनामे करून योग्य त्या प्रमाणात मदत मंजूर करण्याची मागणी शासनाकडे केले.

Post a Comment

0 Comments