हसनाळ येथील पूरग्रस्त लोकांना विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांची भेट,,,,,,,,,,,,,,
नांदेड मुखेड प्रतिनिधी :-प्रताप देवरे
दिनांक 22 ऑगस्ट 2025 रोजी लेंडी धरणातील हसनाळ या गावी पूरग्रस्ता भागाला भेट देण्यात आली विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी पूरग्रस्तांची भेट घेऊन त्यांचे व्यथा जाणून घेण्याचे प्रयत्न केले असून तेथील पूरग्रस्त लोकांची परिस्थिती पाहता आली असून पुरातील वाहून जाऊन मृत्यू पडलेल्या कुटुंबाला पूर्ण सहकार्य करण्याचे आश्वासन अंबादास दानवे यांच्याकडून देण्यात आले,
ढगफुटीमुळे हसनाळ ,रावणगाव , भिंगोली ,भेंडेगाव, भासवाडी, गावामध्ये पाणी शिरले घरे पडले पुराच्या पाण्यात चार महिला एक पुरुष वाहून मृत झाले ,
शेतकऱ्यांची शेकडोच्या संख्येने मोठ्या प्रमाणात गाई म्हशी शेळ्या मेंढ्या पशु पक्षी जनावरे पाण्यात बुडून दगावली आहेत,
आयुष्यभर कमवलेली संपत्ती पुराच्या पाण्यात वाहून गेली , आमच्याकडे आता काहीच राहिले नाही,
आम्ही उघड्यावर आहात
शेकडो घरे उध्वस्त करणाऱ्या लेंडी धरणाच्या कार्यकारी अभियंता विवेकानंद तिडके यांच्यावर गुन्हे दाखल करा यांनी आम्हाला गावात पाणी शिरत नाही म्हणून खोटे बोलून बळजबरीने पोलीस फोर्स लावून लेंडी धरणाचे गाळ भरण्याची काम चालू करून आम्हाला पाण्यात बुडबिले आहे,
आम्हाला दोन दिवस अगोदर सतर्क का केले नाही असे म्हणत पूरग्रस्त लोकांनी कार्यकारी अभियंता विवेकानंद तिडकेला अटक करा अशी जोरदार घोषणा पूरग्रस्ताकडून देण्यात आली
यावेळी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्याकडून जीवन उपयोगी वस्तू देण्यात आल्या पूरग्रस्तांनी पुढे बोलताना सांगण्यात आले की आमचं सर्व काही पाण्यात बुडून गेलेला आहे
आम्ही उध्वस्त झालो,
आमचं शिल्लक काहीच राहिले नाही आम्हाला प्रशासन मदत करत नाही
आम्हाला न्याय द्यावा अशी विनंती पूरग्रस्तांनी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांना करण्यात आली ,
पूर येण्याचा प्रकार हे ढगफुटी नसून मानव निर्मित पाण्यात घरे बुडवायचे तिडके यांचे षडयंत्र होते ,
या गंभीर परिस्थितीला तिडके हेच जबाबदार आहेत असे महिलांकडून बोलले जात होते
हसनाळ येथील पुराने सर्व घरे पडून खंडर झाल्यामुळे पूरग्रस्त लोकांनी जोर जोराने हंबरडा फोडून आपली व्यथा राजकीय नेत्या पुढे सांगत होते, ढगफुटी पुरात गोरगरीब वाहून गेलेल्या लोकांना जबाबदार कोण असा गंभीर प्रश्न सर्वसामान्य जनतेला पडला आहे
तसेच सर्व काही वाहून गेल्यावर प्रशासनाला जाग आली असून पूरग्रस्त लोकांना मदत करण्याचे काम युद्ध पातळीवर चालू आहे हसनाळ येथील नागरिक पुढे बोलताना सांगितले की आज पर्यंत अनेक सत्ताधारी पुढारी येऊन गेले कोणीही आम्हाला आर्थिक मदत केली नाही,
यावेळी शासनाचे अधिकारी तहसीलदार ,उपजिल्हाधिकारी उपविभागीय पोलीस अधिकारी, धरणग्रस्त सामाजिक कार्यकर्ते पत्रकार मोठ्या संख्येने हसनाळ येथे उपस्थित होते,
न्यूज रिपोर्टर प्रताप देवरे मुखेड नांदेड

Post a Comment
0 Comments