Type Here to Get Search Results !

उदगीर येथे सहकारमहर्षी चंद्रकांत आण्णा वैजापूरे यांच्या वाढदिवसानिमित्त श्रीकांत पाटील मित्रमंडळाच्या वतिने विविध कार्यक्रम उत्साहात साजरे.

 *उदगीर येथे सहकारमहर्षी चंद्रकांत आण्णा वैजापूरे यांच्या वाढदिवसानिमित्त श्रीकांत पाटील मित्रमंडळाच्या वतिने विविध कार्यक्रम उत्साहात साजरे..*



सहकारमहर्षी चंद्रकांत आण्णा वैजापूरे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून श्रीकांत पाटील साहेब व श्रीकांत पाटील मित्रमंडळाच्या पदाधिकाऱ्यांकडून विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.

उदगीर येथील महातपस्वी कुमारस्वामी महाराजाच्या चरणी आपल्या गुरूच्या आरोग्य व ऐश्वर्यसंपन्न जीवनासाठी मनोकामना केली,व हजरत खाजा बादशाह सजरोदिन दर्ग्यात आगामी काळात येणाऱ्या संकटावर मात मिळविण्यासाठी व दीर्घायुष्यासाठी दूवा मागितली, तसेच वसतिगृहातील विद्यार्थ्यांना पाठयपुस्तक, पेन, पेन्सिल आणि चॉकलेट वाटून वाढदिवसाच्या निमित्ताने सामाजिक सलोखा निर्माण करून कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा केले. श्री.श्रीकांत पाटील साहेब व सर्व पदाधिकाऱ्यांनी आपल्या देवमाणसाचा वाढदिवस मिठाई वाटूनही उत्साहात साजरा केला.

यावेळी श्री.श्रीकांत पाटील साहेब व श्रीकांत पाटील मिञमडंळाचे अध्यक्ष सचिन वाघमारे,उपाध्यक्ष प्रविन पटवारी,सचिव प्रा.संजय जामकर,कोषाध्यक्ष पवन सुर्यवंशी,प्रशांत हुडगे,प्रशांत खडके,विजय भोसले,अविनाश खरात,सतीश बिरादार,मंगेश येरकुंडे,सोहम रेकुळवाड व इतर उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments