हरित महाराष्ट्र, समृद्ध महाराष्ट्र’ अभियानात संभाजी ब्रिगेडचा सहभाग
उदगीर | (श्रीधर सावळे )
जिल्हाधिकारी लातूर यांच्या निर्देशानुसार नगर परिषद उदगीर कार्यालयाच्या वतीने १५ ऑगस्ट २०२५ रोजी ‘हरित महाराष्ट्र, समृद्ध महाराष्ट्र’ अभियान अंतर्गत वृक्षारोपण उपक्रम राबविण्यात आला. या अभियानात संभाजी ब्रिगेडच्या पदाधिकाऱ्यांनी व सदस्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत बनशेळकी डॅम परिसरात मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण केले.
या वेळी नगर परिषदेचे मुख्याधिकारी सोमनाथ जाधव, नोडल अधिकारी अनिल कुरे, प्रफुल अदावळे, महारुद्र गालट यांची प्रमुख उपस्थिती होती. विशेष म्हणजे संभाजी ब्रिगेडचे जिल्हा कार्याध्यक्ष शिवश्री बाळासाहेब चिंचोलकर आणि तालुका अध्यक्ष शिवश्री राजकुमार भालेराव यांच्या पुढाकारामुळे हा सहभाग उत्साहात पार पडला. जिल्हाध्यक्ष राजकुमार माने यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.
कार्यक्रमात पर्यावरण संवर्धनासाठी सामूहिक सहभाग महत्त्वाचा असल्याचे प्रतिपादन करण्यात आले. या मोहिमेत नगर परिषदेचे अधिकारी-कर्मचारी, बचत गटाच्या महिला, विविध समाजसेवी संस्था आणि मोठ्या संख्येने नागरिक सहभागी झाले.
संभाजी ब्रिगेडचे जिल्हा व तालुका स्तरावरील पदाधिकारी शिवश्री उत्तम फड, शिवश्री श्रीधर जाधव, शिवश्री मेहबूब सय्यद, शिवश्री मोहनेश्वर विश्वकर्मा, शिवश्री धम्मसागर सोमवंशी, शिवश्री नरसिंग बनशेलकीकर, शिवश्री श्याम वाघमारे, शिवश्री सावन तोरणेकर, दीपक करखेलीकर, शिवश्री सुरज आटोळकर यांच्यासह स्थानिक शाखेचे अध्यक्ष राजकुमार सावळे व सचिव शिवकांत कांबळे उपस्थित होते.
या सामूहिक प्रयत्नातून ‘हरित महाराष्ट्र, समृद्ध महाराष्ट्र’ या स्वप्नासाठी सर्वच घटकांनी सातत्याने कटिबद्ध राहावे असा निर्धार व्यक्त करण्यात आला.


Post a Comment
0 Comments