Type Here to Get Search Results !

डी वाय एस पी दीपक कुमार वाघमारे यांना राष्ट्रपती पदक प्रदान

 डी वाय एस पी दीपक कुमार वाघमारे यांना राष्ट्रपती पदक प्रदान 



लातूर (ॲड.एल.पी.उगिले) सेलू येथे नव्यानेच बदलून गेलेले उपविभागीय पोलीस अधिकारी म्हणून पदोन्नतीने सेलू येथे नव्यानेच बदलून गेलेले, लातूर जिल्ह्यातील कर्तबगार आणि गुन्हेगारांचा कर्दनकाळ म्हणून ओळखले गेलेले, पोलीस निरीक्षक दीपककुमार वाघमारे यांच्या आजपर्यंतच्या उत्कृष्ट कामगिरीचे मूल्यमापन करून त्यांना राष्ट्रपती पदक बहाल करण्यात आले आहे. पोलीस निरीक्षक असताना दीपककुमार वाघमारे यांनी अत्यंत शौर्यपूर्ण आणि कित्येक गुंतागुंतीचे आणि गंभीर स्वरूपाचे गुन्हे मोठ्या हुशारीने उघड केले आहेत. त्यांनी केलेल्या तपासा पैकी अनेक गुन्हेगारांना शिक्षा झालेली आहे. पुराव्यासह तपास करणे, गुन्हेगारावर वचक ठेवणे, कायदा व सुव्यवस्था आणि शांतता अबाधित राहण्यासाठी काटेकोर नियोजन करून अंमलबजावणी करणे, हा त्यांचा हातखंड आहे. त्यांच्या अशाच उल्लेखनीय कार्याची दाखल घेऊन स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर त्यांना राष्ट्रपती पदक प्रदान करण्यात आले. हा सन्मान पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांच्या हस्ते जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे व पोलीस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये स्वातंत्र्य दिनाच्या भव्य दिव्य कार्यक्रमात प्रदान करण्यात आले. 

दीपककुमार वाघमारे यांनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमध्ये शिक्षण घेऊन 1995 मध्ये राज्य लोकसेवा आयोगा मार्फत पोलीस उपनिरीक्षक पदावरून आपल्या सेवेचा प्रवास सुरू केला. त्यानंतर राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये कार्य करत असताना गुन्हेगारीवर प्रभावी अंकुश ठेवून जनतेच्या हिताचे रक्षण करणे आपले कर्तव्य समजले. जनतेचा विश्वास संपादन करून पोलीस तपास करण्यामध्ये कशा पद्धतीने यशस्वी होऊ शकतात? याचा एक आदर्श पायंडाच दीपक कुमार वाघमारे यांनी घालून दिला आहे. 

कोणत्याही क्षेत्रात कार्य करत असताना त्या क्षेत्रातील अतिउच्च पदापर्यंत पोहोचणे शक्य नसले तरी त्या क्षेत्रातील अतिउच्च पारितोषक मिळवावे, सन्मान मिळवावा, अशा पद्धतीची जिद्द बाळगणाऱ्या कर्तबगार अधिकाऱ्यांना निश्चित यश मिळत असते. उच्च ध्येय आणि ध्येयाप्रती प्रामाणिक राहून कार्य करण्याची तळमळ ज्यांच्या अंगी आहे. त्यांना ते साध्य होत असते, याचे उदाहरण म्हणूनही पोलीस खात्यातील प्रत्येक कर्मचारी आणि अधिकाऱ्यांनी उपविभागीय पोलीस अधिकारी दीपक कुमार वाघमारे यांच्या कार्याकडे पाहणे गरजेचे आहे. पोलीस निरीक्षक असतानाच त्यांनी जवळपास 275 (रिवार्डस) पारितोषके तसेच 44 प्रमाणपत्रे, जी वरिष्ठ अधिकाऱ्याकडून उत्कृष्ट कार्याबद्दल दिली जातात. तीही मिळवली आहे. इतकेच नाही तर त्यांनी पोलीस महासंचालकाचे सन्मान चिन्ह ही मिळवलेले आहे. अशा पद्धतीने सतत गतिमान राहत स्वातंत्र्य दिनाच्या शुभमुहूर्तावर त्यांना सर्वोच्च बहुमान समजला जाणारा राष्ट्रपती पदकाचाही मान मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आला आहे. 

सेलू येथील उपविभागीय पोलीस अधिकारी अर्थात पोलीस उपाधीक्षक दीपककुमार वाघमारे यांनी गेल्या 30 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये महाराष्ट्र पोलीस सेवेतील अनेक संवेदनशील गुन्ह्याची उकल केलेली आहे. तपास केलेली आहे. इतकेच नाही तर अनेक गुन्हेगारांना जबर शिक्षाही मिळेल, इतके सबळ पुरावे देणारा तपास त्यांनी केला आहे. लातूर येथे ग्रामीण पोलीस स्टेशनला असताना एक वर्षापूर्वी झालेल्या खुनाच्या गुन्ह्याचा तपास अत्यंत चाणाक्ष पद्धतीने तपास करून त्यांनी पूर्ण केला होता. गुन्हेगारांनी गुन्हाही कबूल केला. असे एकापेक्षा एक सरस आणि दर्जेदार पद्धतीच्या तपासाच्या कथा निर्माण झाल्या आहेत. 

 आज पर्यंत त्यांनी विशेष सुरक्षा विभाग नांदेड जिल्हा पोलीस, गडचिरोली, हिंगोली, नाशिक ग्रामीण पोलीस दल, अहमदनगर आणि लातूर जिल्ह्यात उत्कृष्ट कार्य केले आहे. गेल्या दीड दोन वर्षांमध्ये त्यांनी परभणी जिल्ह्यात देखील उत्कृष्ट पद्धतीने सेवा बजावलेली आहे. पोलीस उपनिरीक्षक पदावर असताना केलेल्या एकूण त्यांच्या कारकिर्दीतचा लेखाजोखा प्रशासनाणे विचारात घेऊन त्यांना बहुमान दिला आहे. दीपककुमार वाघमारे यांनी आपल्या दमदार कामगिरीने, स्वतःची एक वेगळीच ओळख निर्माण केलेली आहे, असे म्हणण्यापेक्षा त्यांनी एक नवीन आदर्श निर्माण करून या खात्यामध्ये काम करणाऱ्या, नवीन आलेल्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना दीपस्तंभा सारखा आदर्श निर्माण करून ठेवला आहे. असे म्हटले तर वावगे होणार नाही. 

सध्या ते उपविभागीय पोलीस अधिकारी म्हणून कार्यरत आहेत. त्यांना मिळालेल्या राष्ट्रपती पदकांमुळे सर्वत्र त्यांचे कौतुक केले जात आहे. तसेच अभिनंदन याचा वर्षाव होत आहे.

Post a Comment

0 Comments