उदगीर : बनशेळकी तलावात ३० वर्षीय अज्ञात व्यक्तीचा बुडून मृत्यू – अग्निशमन दलाचे तातडीने बचावकार्य
उदगीर (प्रतिनिधी) :
तालुक्यातील बनशेळकी तलावात रविवारी दुपारच्या सुमारास एका अंदाजे ३० वर्षीय अज्ञात व्यक्तीचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना उघडकीस आली. ही घटना समजताच अग्निशमन दलाचे पथक घटनास्थळी दाखल झाले व मृतदेह शोधून काढण्यात यशस्वी झाले.
अग्निशमन अधिकारी विशाल आल्टे, प्र. अग्निशमन अधिकारी संजय क्षीरसागर, तसेच कर्मचारी रत्नदीप पारके, अरबाज शेख, अखीब शेख, अश्विन गायकवाड, राजकुमार चामले, आकाश कंधारे, शिव शंकर रावडे, राहुल मडभागे व राहुल कांबळे यांनी संयुक्तरीत्या ही मोहीम राबवली. तलावातून मृतदेह बाहेर काढून तो तातडीने सामान्य रुग्णालय, उदगीर येथे हलविण्यात आला आहे.
सदर व्यक्तीची अद्याप ओळख पटलेली नसून, पोलिसांकडून तपास सुरू आहे. घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.



Post a Comment
0 Comments