उदगीरचे श्रीकांत पाटील यांना दै.एकमत कडून कृतज्ञता पुरस्कार प्रदान
उदगीर.....
लातूर येथून प्रकाशित होणारे पुरोगामी विचाराचे दै.एकमत यांच्या वतीने दिला जाणारा कृतज्ञता सन्मान हा मानाचा पुरस्कार उदगीर येथील सामाजिक कार्यकर्ते श्रीकांत पाटील यांना लातुर येथे स्व.दगडोजीराव (दादा) देशमुख स्मृती भवन येथे विलास साखर कारखान्याच्या अध्यक्षा श्रीमती वैशालीताई विलासराव देशमुख यांच्या हस्ते मंगळवारी मान्यवरांच्या उपस्थितीत सन्मानाने प्रदान करण्यात आला
यावेळी दैनिक एकमत चे संपादक मंगेश देशपांडे डोंग्रज कर, शहाजी पाटील कवठेकर, जिल्हा काॅंग्रेसचे अध्यक्ष अभय साळुंके,जेष्ठ पर्यावरण तज्ञ अतुल देऊळगावकर,रेणा साखर कारखान्याचे अध्यक्ष अनंतराव देशमुख, व्हॉईस चेअरमन अँड प्रवीण पाटील, डॉ सारिका देशमुख यांच्या सह मान्यवर उपस्थित होते
*पुरस्काराने कार्याला जवाबदारी वाढते*
श्रीकांत पाटील यांची प्रतिक्रिया
हा सन्मान म्हणजे माझ्या सामाजिक कार्याची पावती असुन,माझ्या कार्याला एवढ्या मोठ्या व्यासपीठावर गौरव मिळणे,हा माझ्या आयुष्यातील प्रेरणादायी आणि अविस्मरणीय क्षण आहे या पुरस्कारामुळे माझ्या कार्याला अधिक गती मिळेल जवाबदारी वाढते असे सांगून दैनिक एकमत परिवाराचे आभार व्यक्त करतो असे यावेळी श्रीकांत पाटील यांनी बोलताना सांगितले

Post a Comment
0 Comments