लिंबगावं येथे शेतीच्या वाटणीवरून लोखंडी रॉडने मारहाण,९ लोकांवर गुन्हे दाखल
उदगीर तालुक्यातील लिंबगाव येथे शेतीच्या वाटणी वरून लोखंडी रॉड मारून जखमी केल्याची घटना २० ऑगस्ट रोजी सकाळी ९ वाजता घडली आहे याप्रकरणी उदगीर ग्रामीण पोलीस ठाण्यात २१ ऑगस्ट रोजी ९ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे,पोलिसांनी दिलेली माहिती अशी की २० ऑगस्ट रोजी लिंबगावं येथे फिर्यादीने चुलत्यास शेत मोजनी करून घेऊ असे सांगितले असता चुलत्याने शेताची मोजणी करायची नाही म्हणून शिवीगाळ करून भांडणाची कुरापत काडून लोखंडी रॉडने,लोखंडी साखळीने,व डोळ्यात मिरची पावडर टाकून मारहाण केली जखमी केले तिघांना मारहाण केली अशी तक्रार राहुल विश्वनाथ सूर्यवंशी यांनी उदगीर ग्रामीण पोलीस ठाण्यात दिल्यावरुन उदगीर ग्रामीण पोलीस ठाण्यात नऊ जाणावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे, अधिक तपास बिट जमादार हे करीत असून जखमींवर उदगीर येथील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहे

Post a Comment
0 Comments