""वंदे भारत रेल्वे उदगीर हून सुरू करा!"'
उदगीर जिल्हा मराठी पत्रकार परिषदेची रेल्वे मंत्र्याकडे मागणी
उदगीर येथून दररोज मुंबई-पुण्या ला जाणारे सर्वात जास्त प्रवासी उदगीर ला..
उदगीर- वंदे भारत रेल्वे ही लातूर-मुंबई धावणार म्हणून बातम्या गाजत आहेत हे खरे असले तरी मुंबई-पुण्या ला जाणारे सर्वात जास्त प्रवासी हे उदगीर परिसरातील असून जर रेल्वे प्रशासन वंदे भारत रेल्वे या मार्गावर सुरू करणार असेल तर ती वंदे भारत रेल्वे सिकंदराबाद, बीदर, उदगीर, लातूर मार्गे चालू करावी अशी मागणी उदगीर जिल्हा मराठी पत्रकार परिषदेने रेल्वे मंत्री श्री वैष्णव तथा मध्य रेल्वे,दक्षिण मध्य रेल्वे ला केले असून आता रेल्वे प्रशासन वंदे भारत बद्दल काय भूमिका घेते किंवा उदगीर करावर परत अन्याय करते हे पहावे लागेल,या निवेदनावर उदगीर जिल्हा मराठी पत्रकार परिषदेचे अध्यक्ष श्रीनिवास सोनी,उपाध्यक्ष अर्जुन जाधव,सचिव सुनील हवा यांच्या सह अनेक सदस्यांच्या सह्या आहेत.यासाठी लवकरच रेल्वे मंत्र्याना उदगीर जिल्हा मराठी पत्रकार परिषदेचे सदस्य भेटून निवेदन देणार असल्याची माहिती अध्यक्ष श्रीनिवासन सोनी यांनी सांगितले.

Post a Comment
0 Comments