Type Here to Get Search Results !

लालबहादुर शास्त्री प्राथमिक शाळेत रक्षाबंधन निमित्त राखी बनवणे कार्यशाळा संपन्न.



उदगीर...... येथील भारतीय शिक्षण प्रसारक संस्था,अंबाजोगाई द्वारा संचलित लालबहादुर शास्त्री प्राथमिक विद्यालयात  रक्षाबंधन निमित्त राखी बनवण्याचे कौशल्य विद्यार्थ्यांना माहीत व्हावे म्हणून कलोपासक मंडळातर्फे इयत्ता दुसरी ते चौथीच्या मुलींसाठी कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.

           या कार्यशाळेसाठी अध्यक्ष म्हणून मुख्याध्यापक अंकुश मिरगुडे,प्रमुख पाहुणे म्हणून माधव केंद्रे,विभाग प्रमुख सुधाकर पोलावार व श्रीमती सुरेखाबाई कुलकर्णी व कलोपासक मंडळ प्रमुख सौ.सोनिया देशपांडे उपस्थित होते.

          प्रमुख पाहुणे माधव केंद्रे यांनी हिंदू धर्मामध्ये राखी पोर्णिमेला अनन्यसाधारण महत्त्व आहे.राखीचा धागा हा पवित्र धागा असतो.बहिण भावाचे अतूट नाते वृद्धींगत करणारा हा सण आहे.आजच्या कार्यशाळेतून राख्या कश्या बनवाव्यात यातील कौशल्ये विद्यार्थ्यांनी आत्मसात करावीत असे सांगितले.

           अध्यक्षीय समारोपपर भाषणात मुख्याध्यापक अंकुश मिरगुडे यांनी सर्व मुलींनी राखी बनवणे कार्यशाळेचा लाभ घेऊन राखी बनवण्याचे कौशल्य प्राप्त करावे.देशी राख्यांना महत्व द्यावे.कार्यशाळेत बनवलेल्या राख्या भावा बांधून रक्षाबंधन सण साजरा करण्याचे आवाहन केले व सर्वांना कार्यशाळेसाठी शुभेच्छा दिल्या.

       कलोपासक मंडळ प्रमुख सौ.सोनिया देशपांडे यांनी राख्या बनवण्याचे प्रत्यक्ष प्रात्यक्षिक करून दाखविले.या कार्यशाळेसाठी सौ.अर्चना सुवर्णकार,सौ.मंजुषा पेन्सलवार व सौ.दैवशाला क्षीरसागर यांनी सहकार्य केले.

Post a Comment

0 Comments