Type Here to Get Search Results !

रेणापुर येथील मारहाण प्रकरणातील आरोपीतांना सहा महिन्याच्या कारावासाची शिक्षा.





लातूर (ॲड. एल पी उगीले) लातूर जिल्ह्यातील रेणापूर येथे घराशेजारी असलेल्या उकिरड्यावर कचरा टाकण्याच्या कारणावरून झालेल्या हाणामारीमध्ये आरोपींना न्यायालयाने दोशी ठरवले आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, पोलीस ठाणे रेणापूर हद्दीत प्रॉपर रेणापुर येथे दिनांक 9 फेब्रुवारी 2020 रोजी सकाळी 08.30 वाजता चे सुमारास घराशेजारी असलेल्या उकिरड्यावर कचरा टाकण्याच्या कारणावरून आरोपीतांनी मिळून फिर्यादीस काठीने मारहाण करून शिवीगाळ केली होती, त्यावरून पोलीस ठाणे रेणापूर येथे गु.र.नं:74/2020 कलम 324, 323, 504, 506, 34 भादवी मधील आरोपी नामे राधिका सूर्यकांत गिरी, (वय 35 वर्ष), सूर्यकांत तुकाराम गिरी, (वय 30 वर्ष),तुकाराम रतन गिरी (वय 68 वर्ष ,सर्व राहणार कामखेडा तालुका रेणापूर) यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. तत्कालीन पोलीस निरीक्षक गोरख दिवे यांचे मार्गदर्शनात पोलीस हेडकॉन्स्टेबल ऊस्तुर्गे यांनी सदर गुन्ह्याचा तपास पूर्ण करून नमूद गुन्ह्यात आरोपी विरुद्ध भरपूर पुरावे जमा करून दोषारोपपत्र न्यायालयात पाठविण्यात आले होते.

               त्यावर वरिष्ठांचे व सध्याचे पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम यांचे मार्गदर्शनात कोर्ट अंमलदार कांदे यांनी वेळोवेळी न्यायालयीन प्रक्रियेचा पाठपुरावा केला. सरकारी अभियोक्ता व्ही. सी. मुरळीकर यांनी सरकारतर्फे बाजू मांडली. नमूद गुन्ह्यात आरोपी विरुद्ध सबळ पुरावे उपलब्ध झाल्याने न्यायालय प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी, प्रथम वर्ग,कोर्ट नंबर 2, रेणापूर चे न्यायाधीश डी. एम. गीते  यांनी नमूद आरोपींना कलम 324 भादवी मध्ये प्रत्येक आरोपीस तीन महिन्याचा साधा कारावासाची शिक्षा व कलम 323 भादवी मध्ये प्रत्येक आरोपीस तीन महिन्याच्या साध्या करावासाची शिक्षा दिली आहे.

Post a Comment

0 Comments