Type Here to Get Search Results !

तलाठी अनुराधा अलगुले व मंडळ अधिकारी पंडित जाधव यांचा जिल्हाधिकारी यांच्याकडून गौरव

 तलाठी अनुराधा अलगुले व मंडळ अधिकारी पंडित जाधव यांचा जिल्हाधिकारी यांच्याकडून गौरव



उदगीर (एल.पी. उगिले )

 महसूल दिन व महसूल सप्ताह समारोह प्रसंगी महसूल विभागात उत्कृष्ट कार्य केलेल्या अधिकारी व कर्मचारी यांचा गौरव प्रमाणपत्र व सन्मान चिन्ह देऊन लातूर जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर -घुगे यांनी केला.

 उदगीर तालुक्यातील हेर महसूल मंडळातील डिग्रस सजा तलाठी अनुराधा अलगुले यांना त्यांनी त्यांच्या कार्यक्षेत्रामध्ये केलेल्या उल्लेखनीय कामाबद्दल उत्कृष्ट तलाठी म्हणून त्यांना सन्मानित करण्यात आले, तसेच हेर विभागाचे मंडळ अधिकारी पंडित जाधव यांनी त्यांच्या कार्यकाळात महसूल प्रशासनाच्या विविध योजना त्याविषयी जनजागृती, विविध प्रकारचे कॅम्पचे आयोजन करून सर्वसामान्यांचे प्रश्न सोडविले, तसेच शेतीला जाणारे रस्ते खुले केले, त्यांनी महसूल न्यायालयातील अनेक प्रलंबित प्रकरणे मार्गी लावले. समाजातील वंचितांना लाभ मिळवून दिला. त्यांनी त्यांच्या कार्यकाळात सेवा हाच धर्म हे समजून कार्य केले. त्यामुळे त्यांना लातूर जिल्ह्यातील उत्कृष्ट मंडळाधिकारी म्हणून जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर घुगे यांनी प्रमाणपत्र व ट्रॉफी देऊन सन्मानित केले. यावेळी लातूर जिल्ह्याच्या अप्पर जिल्हाधिकारी शिल्पा करमरकर, निवासी उपजिल्हाधिकारी केशव नेटके, उदगीरचे उपविभागीय अधिकारी सुशांत शिंदे, तसेच उपविभागीय अधिकारी लातूर रोहिणी नरे, उपविभागीय अधिकारी निलंगा शरद झाडके, उपविभागीय अधिकारी औसा रेनापुर अविनाश कोरडे, उपजिल्हाधिकारी अहिल्या गाठाळ, उपविभागीय अधिकारी अहमदपूर मंजुषा लटपटे, जळकोटचे तहसीलदार राजेश लांडगे यांच्यासह जिल्ह्यातील सर्व तहसीलदार, नायब तहसीलदार, महसूल कर्मचारी, अधिकारी उपस्थित होते.

 हेर मंडळातील तलाठी व मंडळ अधिकारी यांचा सत्कार झाल्यामुळे तसेच पंडित जाधव यांची नायब तहसीलदारपदी पदोन्नती झाल्यामुळे उदगीर चे तहसीलदार राम बोरगावकर, हेरच्या सरपंच सारिका सूर्यवंशी, डीग्रस च्या सरपंच चंद्रसेना ढगे, तुळशीराम बेंबडे, तंटामुक्ती अध्यक्ष बळवंत घोगरे, चेअरमन संगमेश्वर मिटकरी, तलाठी सावन उळागडे, कुमठा येथील सरपंच वर्षा केंद्रे, राष्ट्रवादीचे जिल्हा उपाध्यक्ष सुनीलभाऊ केंद्रे, उपसरपंच ज्ञानेश्वर पाटील, लोहारा येथील माजी पोलीस पाटील दिलीप पाटील, माजी सरपंच रमेश मोमले, माजी उपसरपंच दयानंद सोनटक्के, बबनराव नरवटे, करडखेल पोलीस पाटील एकनाथ कसबे, चेअरमन शिवाजी निडवंचे, व्हाईस चेअरमन मनोहर हत्ते,भाकसखेडा सरपंच अर्चना खेडकर, उपसरपंच अरविंद मोरे, माजी उपसरपंच सुनील फावडे यांच्यासह परिसरातील सर्व सामान्य नागरिकाकडून अभिनंदन होत आहे.

Post a Comment

0 Comments