Type Here to Get Search Results !

स्मार्ट वीज मीटर लावणे बंधनकारक नाही, गुत्तेदारांनी वीज ग्राहकांना त्रास देऊ नये - स्वप्निल अण्णा जाधव




उदगीर (प्रतिनिधी) 

सध्या लातूर जिल्ह्यामध्ये स्मार्ट मीटर बसवण्याची मोहीम सुरू झाली आहे. वास्तविक पाहता वीज कायदा 2003 च्या कलम 55 प्रमाणे स्मार्ट वीज मीटर लावणे बंधनकारक नाही. असे महाराष्ट्र वीज ग्राहक संघटनेचे विदर्भ प्रदेशाचे अध्यक्ष प्रशांत दर्यापूरकर यांनी सर्व वीज ग्राहकांना कळविले आहे. याची नोंद वीज वितरण कंपनीच्या कर्मचारी व अधिकाऱ्यांनी घ्यावी, असेही आवाहन युवा नेते स्वप्निल अण्णा जाधव यांनी केले आहे. 

वीज मीटर बदलण्यासाठी येणारे ठेकेदार आहेत. ती एक नोडल एजन्सी आहे. या नोडल एजन्सीला आपण वीज मीटर लावू नका, असे स्पष्ट सांगावे. त्यांनी जर हे अमान्य केले तर त्यांना हाकलून लावावे. कारण नूडल एजन्सीला हाकलून लावने सरकारी कामात अडथळा होत नाही, असेही विधीज्ञ दर्यापूरकर यांनी स्पष्ट केले आहे. यासंदर्भात कोणत्याही कायद्यानुसार सरकारी कामात अडचण आणणे ही केस आपल्यावर या बाबतीत लागू होऊ शकत नाही. स्मार्ट मीटर लावायला आलेल्या लोकांना हे मीटर लावणे आवश्यक असल्याबाबत महाराष्ट्र सरकारच्या आदेशाची, परिपत्रकाची प्रत मागावी. जी ते तुम्हाला देऊ शकत नाहीत. असेही वीज ग्राहक संघटनेने म्हटले आहे. हे मीटर लावणे सर्वांनी ताबडतोब बंद करावे. कारण या मीटरच्या वेगवान फिरल्याने विज बिल भरता भरता आपल्याला अतोनात त्रास होणार आहे. एकदा का जर हे मीटर आपण लावले तर त्याला पुन्हा कोणीही परत काढू शकणार नाही. याची सर्वांनी जाणीव ठेवावी, असेही महाराष्ट्र वीज ग्राहक संघटनेने म्हटल्याचे स्वप्निल अण्णा जाधव यांनी सांगितले आहे. 

पुढे बोलताना स्वप्निल अण्णा जाधव यांनी मध्य प्रदेश हायकोर्टाच्या निकालाचाही हवाला दिला आहे. मध्यप्रदेश हायकोर्टने वीज ग्राहकांना स्पष्ट केले आहे की स्मार्ट मीटर लावणे हे अनिवार्य नाही. थाई स्वरूपातील मिटर घेत असतील तर त्यांच्यासाठी ते अनिवार्य आहे मात्र नियमित ग्राहकांसाठी ते अनिवार्य नाही. संदर्भात विधिज्ञ शरद जोशी यांच्या म्हणण्यानुसार वीज ग्राहकांच्या लेखी परवानगीशिवाय स्मार्ट मीटर बसवणे हे कायद्याने अपराध ठरू शकेल जबरदस्ती करून मीटर जर कोणी बसवत असेल तर तो उच्च न्यायालयाच्या आदेशाचा अवमान ठरेल अशा पद्धतीच्या महत्त्वपूर्ण न्यायालयीन कारवाई बद्दल सीहोर ब्लॉक काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष निशांत वर्मा यांनी आभार मानले आहेत, अशी ही माहिती युवा नेते स्वप्निल अण्णा जाधव यांनी दिली आहे.

स्मार्ट मीटर बसवणे हे खाजगी कंपनीने कंत्राट घेऊन शासनाच्या काही लोकांना हाताशी धरून हे काम चालू केले आहे. भविष्यात हे मीटर रिचार्ज सिस्टीम चे होणार आहेत. त्यामुळे राज्यात त्याचा विरोध सुरू असताना तुमच्या घरी येऊन जबरदस्तीने मीटर बसवण्याचे काम वीज वितरण कंपनी करत असेल तर त्यांना ताबडतोब विरोध करावा. जीनियस या कंपनीचे मीटर ज्यांच्या घरी बसवले आहे, त्यांना आता दुप्पट बिल येऊ लागले आहेत. याकडे महाराष्ट्र विज ग्राहक संघटनेने लक्ष वेधले आहे. भविष्यात आपली लुबडणूक होणार नाही यासाठी जनतेने स्मार्ट मीटरला तीव्र विरोध करावा या संदर्भामध्ये काही स्वयंसेवी संस्था स्वतंत्रपणे अर्जाचा नमुना तयार करत आहेत तशा पद्धतीचा अर्ज ग्राहकाने महावितरणला देऊन त्याची पोचपावती घ्यावी त्यासाठी सर्वांनी सावध राहावे असेही आवाहन युवा नते स्वप्निल अण्णा जाधव यांनी केले आहे.

Post a Comment

0 Comments