Type Here to Get Search Results !

सामाजिक अभियंता: डॉ. अनिलकुमार गायकवाड, लंडन येथे सन्मानित

 सामाजिक अभियंता: डॉ. अनिलकुमार गायकवाड, लंडन येथे सन्मानित



महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे सहव्यवस्थापकीय संचालक डॉ. अनिलकुमार गायकवाड यांचे सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रातील विधायक कार्य फार मोठे राहिले आहे. आपल्या खात्याशी संबंधित कामात ते निपुण तर आहेतच आहेत, शिवाय त्यांची एकूण काम करण्याची पद्धत ही समाजाची जडणघडण घडवून आणणारी आहे. म्हणूनच त्यांना सामाजिक अभियंता म्हणता येईल. नव्या समाजाची निर्मिती करण्यासाठी त्यांचे धडपड कौतुकास्पद आहे. लोककल्याणकारी कामाची दखल घेऊन त्यांना लोकमत ग्लोबल इकॉनोमिक कन्व्हेन्शन, लंडन 2025 या भव्य समारंभामध्ये महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे उपाध्यक्ष तथा कार्यकारी संचालक डॉ. अनिलकुमार बळीराम गायकवाड यांना लोकमत महाराष्ट्र रत्न पुरस्कार देऊन गौरविण्यात येत आहे. सन्मानित केले जात आहे. हे त्यांच्या अभियंता म्हणून च्या दूरदृष्टी पूर्ण नियोजनाचे, सुयोग्य अमलबजावणीचे आणि पायाभूत सुविधांच्या सातत्यपूर्ण उभारणीसाठी केलेल्या योगदानाचे, योग्य मूल्यांकन आहे. महाराष्ट्राच्या विकास यात्रेत त्यांनी दिलेला वेग व दर्जेदार अभियांत्रिकीचा ठसा निश्चितच अभिमानास्पद आहे. 

त्यांचे कार्य हे सरकारी सेवा पुरते सीमित नाही. सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रात विधायक कार्यात त्यांचा सहभाग फार मोठा आहे. मराठवाड्याच्या भूमीतील या सुपुत्राच्या नावाने विविध स्वयंसेवी संस्थांच्या माध्यमातून त्यांची मुले सामाजिक जाणीव जपण्यासाठी अनेक उपक्रम प्रत्यक्ष राबवत आहेत. त्यामध्ये विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य देऊन सहकार्य करणे असेल, बलोउपवासासाठी युवकांना व्यायामाचे साहित्य देऊन, खुल्या जीम आणि व्यायाम शाळा काढल्या आहेत. त्यासोबतच ग्रामीण भागातील तरुणांमध्ये बेकारीमुळे उदासीनता येऊ नये, तसेच त्यांना नोकरीच्या ठिकाणी अडचणी येऊ नयेत, या दृष्टीने गाव पातळीवर स्पर्धा परीक्षा मार्गदर्शक पुस्तकांची उपलब्धता करून देऊन छोटेखानी वाचनालय उभा केले आहेत, वाचन संस्कृती विकासामध्ये देखील त्यांनी दिलेले योगदान लाख मोलाचे आहे. 

अनिल गायकवाड यांच्या प्रशासकीय कौशल्य बरोबरच त्यांचे अभियांत्रिकी क्षेत्रातील अर्थात टेक्निकल ज्ञानाची, कल्पकतेची, प्रतिभेची उंची फार मोठी असल्याने त्यांना त्यांच्या अनुभवाच्या जोरावर राज्याला फायदा होईल, म्हणून महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या संचालक पदी नियुक्त करण्यात आली. तसे तर सार्वजनिक बांधकाम विभागाच्या सचिव पदावरून डॉ. अनिलकुमार गायकवाड हे सेवानिवृत्त झाले आहेत, मात्र त्यांच्या दांडग्या अनुभवाचा आणि कल्पकतेचा उपयोग समाजाला आणि शासनाला झाला पाहिजे. या दूरदृष्टीने महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या सहव्यवस्थापकीय संचालक पदी त्यांना नियुक्त करण्यात आली आहे. त्यांच्या हातातून अनेक प्रकल्प यशस्वीरित्या उभारले गेले आहेत. त्यांच्या नेतृत्व दीपक कामगिरीमुळे त्यांचा उल्लेख करताना सर्वोच्च गुणवत्ताधारक कल्पक अधिकारी म्हणून केला जातो. 

जवळपास 40 वर्षापेक्षा जास्त कालखंड त्यांनी उत्कृष्ट कार्य केले आहे. म्हणजेच चार दशकावूनी अधिक काळाची कारकीर्द असलेल्या डॉ. अनिलकुमार गायकवाड यांच्या ठिकाणी काम करण्याची प्रचंड ऊर्जा आहे. त्यांची अफाट कार्यक्षमता त्यांच्या संपूर्ण विभागाला क्षणोक्षणी पाहायला मिळते.रस्ते, इमारती आणि राज्य रस्ते विकास महामंडळ या तिन्ही विभागाचे सचिव म्हणून त्यांनी एकाच वेळी समर्थपणे पेलण्याचा इतिहास घडवला आहे. या क्षेत्रावर अशा पद्धतीचे कार्य पूर्वी कधी झाले नव्हते.

सद्यस्थितीत राज्य रस्ते विकास महामंडळ येथे व्यवस्थापकीय सहसंचालक असलेले डॉ. अनिलकुमार गायकवाड यांच्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल राज्य सरकारने उत्कृष्ट अभियंता पुरस्कार देऊन दोन वेळा राज्यपालांच्या हस्ते त्यांचा गौरव केलेला आहे. तसेच स्थापत्यकला क्षेत्रातील नेतृत्व दीपक कामगिरी केल्याबद्दल राजस्थानच्या पिलानी येथे श्रीधर युनिव्हर्सिटीने मानद डॉक्टरेटची पदवी देऊन सन्मानित केलेले आहे. 

मुंबई येथील अनेक उड्डाणपुले, मुंबई फोर्ट येथील सार्वजनिक बांधकाम भवन, नवी दिल्लीतील दिमाखदार असे महाराष्ट्र सदन, मंत्रालयात लागलेल्या आगी नंतर मंत्रालयाचे करण्यात आलेले आकर्षक मेकओहर, मोखाडा येथील वैतरणा प्रकल्पात 276 फुटावर बांधलेला आव्हानात्मक पूल असे अनेक प्रकल्प अनिलकुमार गायकवाड यांच्या कल्पकतेतून साकारलेले आहेत. त्यांच्याच मार्गदर्शनाखाली मुंबई, पुणे महामार्गावरील मिसिंग लिंक रोड, बांद्रा वर्सोवा सी लिंक रोड, कोस्टल रोड अशा महत्त्वाच्या प्रकल्पांनी आकार घेतला आहे. विशेष म्हणजे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे नागपूर मुंबई समृद्धी महामार्ग या प्रकल्पाची जबाबदारी सुद्धा रस्ते विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक राधेश्याम मोपलवार यांच्यासोबत अनिलकुमार गायकवाड यांच्या खांद्यावर होती. 

या सोबतच पुण्यातील हजारो कोटींचा रिंग रोड ही गायकवाड यांच्याच अभियांत्रिकी प्रतिभेचे अपत्य आहे, असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. या कामाची लवकर सुरुवात होऊन त्यांच्याच नेतृत्वाखाली यशस्वीपणे पूर्णत्वास जाईल, यात तिळमात्र शंका नाही. वयाच्या साठी ओलांडली असली तरी त्यांचा उत्साह आणि ऊर्जा प्रचंड आहे. त्यांच्या अफाट ऊर्जेमुळे कार्यक्षमताही तरुणांना लाजवणारी आहे. त्यांचे कार्यकर्तृत्व हे सरकारी सेवेपुरते मर्यादित अजिबात नाही, कारण डॉ. अनिल कुमार गायकवाड सामाजिक सेवा कुंड आणि इंजि. विश्वजीत अनिलकुमार गायकवाड फाउंडेशन या संस्थांच्या माध्यमातून राबवण्यात आलेले अनेक उपक्रम हे सामाजिक जाणीव जपणारे आहेत. त्यांचे वडील स्वातंत्र्य सेनानी बळीराम गायकवाड हे स्वतः शिक्षक होते. पण आपल्या गावात शाळा नसल्याने दुसऱ्या गावी पायी जाऊन विद्यार्थ्यांना शिकावे लागले, ही गोष्ट त्यांच्या मनात सतत खटकत होती. त्यामुळेच अनिलकुमार गायकवाड यांनी गरीब, गरजू, होतकरू विद्यार्थ्यांना सहकार्य करावे अशी भावना बळीराम गायकवाड यांनी बोलून दाखवत होती. ते प्रत्यक्ष कृतीत आणण्याचे काम अनिलकुमार गायकवाड आणि त्यांची मुले करत आहेत. गरिबाबद्दल प्रचंड जिव्हाळा, सहानुभूती आणि विद्यार्थ्यांना मदत करण्याची प्रवृत्ती यातूनच भुकेल्या माणसाला अन्न, रुग्णांना औषध उपचार, गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्य अशा पद्धतीचा अखंड मदतीचा झरा त्यांनी चालू ठेवला आहे.        

उदगीर सारख्या ग्रामीण भागात देखील मोबाईल ॲम्बुलन्सच्या माध्यमातून रुग्णसेवा चालू करण्याचे कार्य त्यांनी चालू केले आहे. या दातृत्वाच्या कहाण्या नसून लोक माणसांना मिळालेला मदतीचा हात आहे. त्यांच्या प्रेरणेने अनेक कार्यकर्ते सामाजिक जाणीवा जपण्याचे धडे गिरवत आहेत. 

अनिल कुमार गायकवाड यांचा एकूण जीवनक्रम देखील इतरांसाठी अत्यंत प्रेरणादायी आहे. त्यांनी साडेतेरा वर्षाचे असताना तत्कालीन मॅट्रिकची परीक्षा उत्कृष्ट गुणासह उत्तीर्ण झाले. तसेच वयाच्या 17 वर्षी पॉलिटेक्निक झाले. त्यानंतर दोन वर्ष प्राध्यापक म्हणून कार्य केले, आणि 21 व्या वर्षी ए एम आय इ ची परीक्षा उत्तीर्ण झाले. आणि वयाच्या 22 व्या वर्षी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या एकमेव जागेवर वर्ग एकचे अधिकारी म्हणून निवडले गेले. हा त्यांचा इतरांसाठी अत्यंत प्रेरणादायी ठराव असा प्रवास आहे. एका बाजूला चातुर्वर्ण व्यवस्थेच्या टीका आणि टिप्पणीचे चटके सहन करत आपला आदर्श निर्माण करण्याची त्यांची कार्यप्रणाली निश्चितच प्रेरणादायी आहे. अधिकारी मोठा असला तरी सामाजिक जाणीवा जपण्याची तळमळ त्यांच्यामध्ये असल्यामुळे ते लोक माणसात मिसळून राहतात. त्यांची खास शैली म्हणजे ते सतत लोकांचे फोन, मेसेज, बैठका यासाठी वेळ देतात. हे त्यांचे मोठेपण आहे.


अशा सामाजिक जाणीव जपणाऱ्या अधिकाऱ्याला मिळालेला हा सन्मान निश्चितच प्रेरणादायी आहे. त्यांच्या भावी आयुष्यासाठी साप्ताहिक पोलीस फ्लॅश न्यूज, साप्ताहिक पोलीस संदेश रिपोर्टर, पोलीस फ्लॅश न्यूज वेब पोर्टल, आजची पोलखोल पोर्टल परिवाराच्यावतीने हार्दिक हार्दिक शुभेच्छा!


आपला,

ॲड. एल. पी. उगीले, उदगीर

Post a Comment

0 Comments