पुणे प्रतिनिधी शंकर जोग,
रिपब्लिकन सेनेच्या पुणे शहर अध्यक्षपदी हणमंत अण्णा पपुल यांची नियुक्ती करण्यात आली हे नियुक्तीपत्र रिपब्लिकन सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष सरसेनानी आनंदराज आंबेडकर यांच्या हस्ते देण्यात आले, यावेळी रिपब्लिकन कामगार सेनेचे प्रमुख युवराज दादा बनसोडे, रिपब्लिकन विद्यार्थी सेनेचे प्रदेशाध्यक्ष विवेक बनसोडे, रिपब्लिकन सेनेचे महाराष्ट्र प्रदेश सचिव विनोद काळे, संतोष साखरे, परविन डी राव, गजानन मुळजे, आदि यावेळी उपस्थित होते, पुणे शहरात आंबेडकर चळवळीत गेले अनेक वर्षापासून सक्षमपणे काम करणारे हणमंत अण्णा पपूल यांची ओळख आहे शोषित पीडित वंचितांच्या न्याय हक्कासाठी अनेक आंदोलन केले,
यावेळी निवडीनंतर वरिष्ठांनी दिलेली जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडेन व पुणे शहरामध्ये रिपब्लिकन सेनेची जास्तीत जास्त ताकद वाढवण्याचा प्रयत्न करणार असल्याचे नवनिर्वाचित अध्यक्ष हणमंत पपुल यांनी यावेळी सांगितले,

Post a Comment
0 Comments