पुणे प्रतिनिधी :-शंकर जोग,
नागरिकांना कमी दरात उपचार मिळावा यासाठी महाराष्ट्र मुस्लिम कॉन्फरन्स या संघटनेच्या वतीने कोंढवा परिसरातील गरजू नागरिकांसाठी एक नवीन आरोग्य सेवा सुरू करण्यात आली आहे एम एम सी क्लिनिक या नावाने सुरू करण्यात आलेल्या या क्लिनिकमध्ये केवळ दहा रुपयांमध्ये तपासणी करून औषधे आणि इंजेक्शनची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे, याचे उद्घाटन माजी सहाय्यक पोलीस आयुक्त मिलिंद गायकवाड यांच्या हस्ते करण्यात आले,
या कार्यक्रमाचे आयोजक महाराष्ट्र मुस्लिम कॉन्फरन्स या संघटनेचे संस्थापक अध्यक्ष हाजी जुबेर मेमन यांनी सांगितले गरीब व गरजू लोकांपर्यंत स्वस्त आणि सुलभ आरोग्य सेवा पोहोचवणे हेच या संघटनेचे मुख्य उद्दिष्ट आहे त्यांनी नागरिकांना आवाहन केले या सेवेचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा आणि आरोग्यपूर्ण जीवन जगावे असे सांगितले,
यावेळी रुग्ण हक्क परिषदेचे अध्यक्ष उमेश चव्हाण, संघटनेचे पुणे शहर अध्यक्ष फरद खान, पुणे शहर महिला अध्यक्षा फरहिंन सय्यद, युवक अध्यक्ष गौस शेख, डॉ. फरदीन सय्यद, आदि यावेळी उपस्थित होते,

Post a Comment
0 Comments